शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

फार्मासिस्ट नव्हे, ड्रेसरने तपासले रुग्ण : डिक दवाखान्यातील धक्कादायक प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 12:25 AM

मनपाच्या डिक दवाखान्यातील डॉक्टर शुक्रवारी गैरहजर असल्याने त्यांच्या जागेवर स्वत:ला फार्मासिस्ट म्हणून घेणाऱ्या चक्क ‘ड्रेसर’ने रुग्ण तपासले. चतुर्थ कर्मचाऱ्यांकडून रुग्णांची तपासणी होत असेल तर मनपाच्या दवाखान्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्याचे कारण काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ठळक मुद्देरुग्णाच्या जीवाशी खेळ : प्रभारी आयुक्तांनी घेतली डॉक्टरांची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मनपाच्या डिक दवाखान्यातील डॉक्टर शुक्रवारी गैरहजर असल्याने त्यांच्या जागेवर स्वत:ला फार्मासिस्ट म्हणून घेणाऱ्या चक्क ‘ड्रेसर’ने रुग्ण तपासले. चतुर्थ कर्मचाऱ्यांकडून रुग्णांची तपासणी होत असेल तर मनपाच्या दवाखान्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्याचे कारण काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

‘लोकमत’ने १३ जुलैच्या अंकात ‘डॉक्टर सुटीवर, फार्मासिस्ट तपासतो रुग्ण’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करताच खळबळ उडाली. मनपाचे प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी शनिवारी डॉक्टरांची बैठक घेऊन या प्रकरणाचा आढावा घेतला. यामुळे दोषींवर मनपा प्रशासन काय कारवाई करते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.मनपा दवाखान्यातील आरोग्य सेवांची भीषण दुरवस्था व विषमतेला घेऊन शुक्रवारी ‘लोकमत’ चमूने व्हीआयपी रोड धरमपेठ येथील मनपाच्या डिक दवाखान्याला भेट दिली. बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची लांब रांग लागली होती. दवाखान्याच्या प्रमुख डॉ. भावना सोनकुसळे या गैरहजर होत्या. यामुळे स्वत:ला फार्मासिस्ट म्हणणाºया इसमाने रुग्णाला तपासण्याची जबाबदारी घेतली. येथील परिचारिका दीपाली गणोरकर रुग्णांकडून ‘ओपीडी रजिस्ट्रेशन’ फी घेत होत्या तर त्यांच्याच बाजूला बसलेला फार्मासिस्ट रुग्णाची तपासणी करून स्वत:च औषधाचे वाटप करीत होता. लोकमत प्रतिनिधीलाही त्यानेच तपासून औषधेही दिली. शनिवारी या प्रकरणाची आणखी माहिती घेतली असता तो फार्मासिस्ट नव्हे तर रुग्णांच्या जखमेवर मलमपट्टीचे काम करणारा ‘ड्रेसर’ असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे, दवाखान्याच्या प्रमुख डॉ. सोनकुसळे यांनी शुक्रवारी रीतसर सुटी घेतली नव्हती, यामुळे मनपा प्रशासनाला त्यांच्या जागी दुसºया डॉक्टरांची ड्युटी लावता आली नसल्याचेही पुढे आले आहे. शनिवारी मात्र त्यांनी रीतसर सुटी घेतल्याने मनपा प्रशासनाला त्यांच्या जागी वेळेवर दुसºया डॉक्टरांची ड्युटी लावावी लागली. सूत्रानूसार, या घटनेला घेऊन मनपाच्या आरोग्य विभागाच्या (एम) अधिकारी डॉ. सरिता कामदार यांनी डिक दवाखान्याला भेट देऊन माहिती घेतल्याचे समजते. मनपाचे प्रभारी आयुक्त ठाकरे यांनी कायमस्वरुपी असलेल्या डॉक्टरांची बैठक घेतली. भविष्यात अशी घटना घडू नये याबाबत चर्चाही केली.नागपूरकरांनी व्यक्त केला संतापया प्रकरणाबाबत मात्र नागपूरकरांमध्ये संतापाचे वातावरण आहे. काहींनी ‘लोकमत’ला फोन करून हा प्रकार डिक दवाखान्यातच चालत नाही तर मनपाच्या इतरही दवाखान्यात चालत असल्याचे पुरावे देत सांगितले. लोकांच्याच पैशातून त्यांच्याच जीवाशी सुरू असलेला हा खेळ थांबविण्याची मागणीही अनेकांनी केली.रुग्ण तपासणाऱ्याला नोटीस बजावणारमनपाचे आरोग्य विभाग (एम) सुधारण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. ‘लोकमत’च्या माध्यमातून शनिवारी समोर आलेल्या घटनेचा आढावा घेण्यात आला. डॉक्टरांच्या अनुपस्थितीत रुग्ण तपासणाऱ्याला नोटीस बजावली जाईल.रवींद्र ठाकरेप्रभारी आयुक्त, मनपा

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाhospitalहॉस्पिटल