लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाचपावली पोलीस ठाणे हद्दीतील वैशालीनगर येथे एका युवकाला गोळी मारून जखमी करण्यात आले. सोमवारी रात्री १० वाजता घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. पाचपावली पोलीस रात्री उशिरापर्यंत तपास करीत होते.कपिल कुलदीप तुराटे (३२) रा. जोशीवाडी, पाचपावली असे जखमीचे नाव आहे. कपिल फिश फ्रायचा ठेला लावतो. सूत्रानुसार रात्री १० वाजता बाईकवर आलेल्या दोन युवकांनी कपिलवर गोळीबार गेला. परंतु त्यांचा निशाणा चुकल्याने गोळी कपिलच्या हाताला लागली. गोळी चालल्याचा आवाज ऐकताच परिसरात खळबळ उडाली. काही लोकांनी पोलिसांना सूचना दिली. पाचपावली व यशोधरानगर पोलीस घटनास्थळी पोहोचले. कपिलला लगेच पाचपावलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार कपिलचा काही युवकांशी वाद सुरू आहे. या वादातूनच गोळीबार झाल्याचे सांगितले जाते. पाचपावली आणि गुन्हे शाखा पोलिसांनी रात्री उशिरा काही संशयास्पद युवकांना ताब्यात घेतले आहे.
उत्तर नागपुरातील वैशालीनगरात गोळीबार, युवक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 23:56 IST
पाचपावली पोलीस ठाणे हद्दीतील वैशालीनगर येथे एका युवकाला गोळी मारून जखमी करण्यात आले. सोमवारी रात्री १० वाजता घडलेल्या या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. पाचपावली पोलीस रात्री उशिरापर्यंत तपास करीत होते.
उत्तर नागपुरातील वैशालीनगरात गोळीबार, युवक जखमी
ठळक मुद्देमोटरसायकलवर आलेल्या दोघांचे कृत्य