शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

विना शस्त्रक्रिया हृदयाचे वॉल्व बदलविणे शक्य : अमेरिकेचे हृदय रोग तज्ज्ञ जेटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 23:44 IST

मानवाच्या हृदयात चार ‘वॉल्व’ असतात. जर कुठला ‘वॉल्व’ खराब झाला तर त्याला ‘ओपन हार्ट सर्जरी’च्या मदतीने बदलविले जाते. या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला सामान्य होईपर्यंत दोन महिन्यापर्यंतचा कालावधी लागतो. परंतु आता ‘ट्रान्स क्यूटेनियस वॉल्व रिप्लेसमेंट’ (टीसीव्हीआर) तंत्रज्ञानामुळे विना शस्त्रक्रिया ‘वॉल्व’ला बदलविल्या जाऊ शकते आणि रुग्ण केवळ एक दिवसातच सामान्य जीवन जगू शकतो. सध्या हे तंत्रज्ञान अमेरिकेच्या न्यूयार्क शहरात मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे. भारतात निवडक ठिकाणी याची सुरूवात झाली आहे, अशी माहिती अमेरिकेचे प्रसिद्ध हृदय रोग विशेषज्ञ डॉ. शरद सी. जेटली यांनी ‘लोकमत’ला दिली.

ठळक मुद्दे‘टीसीव्हीआर’ तंत्र प्रभावी, आता ‘ओपन हार्ट सर्जरी’ची गरज नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मानवाच्या हृदयात चार ‘वॉल्व’ असतात. जर कुठला ‘वॉल्व’ खराब झाला तर त्याला ‘ओपन हार्ट सर्जरी’च्या मदतीने बदलविले जाते. या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला सामान्य होईपर्यंत दोन महिन्यापर्यंतचा कालावधी लागतो. परंतु आता ‘ट्रान्स क्यूटेनियस वॉल्व रिप्लेसमेंट’ (टीसीव्हीआर) तंत्रज्ञानामुळे विना शस्त्रक्रिया ‘वॉल्व’ला बदलविल्या जाऊ शकते आणि रुग्ण केवळ एक दिवसातच सामान्य जीवन जगू शकतो. सध्या हे तंत्रज्ञान अमेरिकेच्या न्यूयार्क शहरात मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे. भारतात निवडक ठिकाणी याची सुरूवात झाली आहे, अशी माहिती अमेरिकेचे प्रसिद्ध हृदय रोग विशेषज्ञ डॉ. शरद सी. जेटली यांनी ‘लोकमत’ला दिली.डॉ. जेटली यांनी १९७७ मध्ये नागपूरच्या मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसचे शिक्षण घेतले. फेलोशिपसाठी ते अमेरिकेला गेले. कार्डिओलॉजीमध्ये तीन फेलोशिप करून त्यांनी तीन दशकांपर्यंत अमेरिकेच्या विद्यापीठात शिकविले. अल्बर्ट आइन्स्टाइन, माउन्ट साईनाई आणि न्यूयार्क मेडिकल कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम केलेले डॉ. जेटली म्हणाले, हृदयरोग उपचारात अद्यावत तंत्रज्ञान उपलब्ध होऊ लागले आहे. यातील एक म्हणजे ‘टीसीव्हीआर’ तंत्रज्ञान प्रभावशाली ठरले आहे. हाताच्या किंवा पायाच्या धमनीमधून कृत्रिम ‘वॉल्व’ला हृदयात बसविले जाते. भारतात मोजक्याच ठिकाणी हे तंत्रज्ञान वापरले जाते. नागपुरात हृदयरोगाच्या उपचारात अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे.‘अ‍ॅसिडीटी’समजून दुर्लक्ष करू नयेडॉ. जेटली म्हणाले, काही लोकं छातीत जळजळ होतेय, ‘अ‍ॅसिडीटी’ असेल असे समजून दुर्लक्ष करतात. काही लोकं उपचार टाळतात. परंतु असे करणे धोकादायक ठरू शकते. ही लक्षणे हृदय विकाराच्या झटक्याची असू शकतात. यामुळे छातीच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका, असा सल्लाही डॉ. जेटली यांनी दिला.जिथे सोयी, तिथेच उपचारडॉ. जेटली म्हणाले, जिथे हृदयरोगावर उपचाराची सोय आहे तिथेच उपचार घ्यावा. हृदय विकाराचा झटका आल्यावर तातडीने उपचार घेतल्यास धोका टळतो. म्हणून या रोगाबाबत माहिती व जागरुक असणे आवश्यक आहे. एका हृदय विकाराच्या झटक्याला पूर्ण होण्यास चार तास लागतात. म्हणजेच, हृदयामध्ये ‘क्लॉट ब्लस्टर’ची प्रक्रिया पूर्ण व्हायला चार तास लागतात. हृदय विकाराच्या झटक्यानंतरही २४ तासापर्यंत काही रुग्ण जीवंत राहू शकतात.पायावरील सूज, चक्कर याकडे दुर्लक्ष नकोजर कुण्या व्यक्तीला छातीत दुखत असेल, नेहमीच पायावर सूज राहत असेल, चक्कर येत असेल, श्वास लागण्याची समस्या असले तर याकडे दुर्लक्ष करू नये. हे हृदयरोगाची लक्षणे असू शकतात. डॉ. जेटली म्हणाले, अशा रुग्णांची तातडीने ‘ईसीजी’ व आवश्यक तपासणी करणे आवश्यक ठरते. आजाराला दूर ठेवण्यासाठी नियमीत व्यायाम करा, ‘मॉर्निंग वॉक’ला प्राधान्य द्या, हे हृदयाला मजबूत बनविते.‘मुनिमीटर’मधून रुग्णांची जनजागृती३० ते ३५ वर्षापर्यंत वैद्यकीय शिक्षण दिल्यानंतर लोकांना जागरुक करण्याचे कार्य डॉ. जेटली यांनी हाती घेतले आहे. यासाठी त्यांना त्यांचा मुलगा मुनि एस. जेटली मदत करीत आहे. कोलंबिया बिजनेस शाळेतून मुनि ‘एमबीए’ करीत असून ‘मुनिमीटर हेल्थ डॉट कॉम’चा तो ‘सीईओ’ आहे. रुग्णांना शिक्षीत करण्यासाठी कॉर्डिओलॉजीवर आधारित ५०० पेक्षा अधिक व्हिडीओ डॉ. शरद जेटली यांनी इंग्रजी आणि हिंदी भाषेत तयार करून ‘यूट्यूब’वर टाकले आहे. जगातील ८० देशांतील लोक ‘मुनिमीटर’चे अनुसरण करतात. १.५० लाख मिनीट्सपेक्षा अधिकवेळा हे व्हिडीओ पाहण्यात आले आहेत. डॉ. जेटली म्हणाले, या कार्यासाठी मुलगा मुनिने एक सेटअप तयार करून दिला आहे. यात व्हिडीओ बनवून अपलोड करतो. रोज ३६वर प्रश्न विचारले जातात. त्याचे उत्तरही देतो. रुग्णांमध्ये जनजागृती करण्यासाठी ही वेबसाइट प्रभावी ठरली आहे. वेबसाईटचे एक हजारापेक्षा जास्त ‘सब्सक्राइबर’ आहेत.

टॅग्स :Heart DiseaseहृदयरोगHealthआरोग्य