काम न करणाऱ्या कंत्राटदारांची आता खैर नाही : काळ्या यादीत टाकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 12:54 AM2021-03-05T00:54:49+5:302021-03-05T01:00:21+5:30

Non-performing contractors be black listed राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत करायच्या नळ योजनांचे काम वेळेत पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांची आता खैर नाही. अशा कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी दिले.

Non-performing contractors are no longer doing well, be black listed | काम न करणाऱ्या कंत्राटदारांची आता खैर नाही : काळ्या यादीत टाकणार

काम न करणाऱ्या कंत्राटदारांची आता खैर नाही : काळ्या यादीत टाकणार

Next
ठळक मुद्देजि.प. स्थायी समितीचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत करायच्या नळ योजनांचे काम वेळेत पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांची आता खैर नाही. अशा कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी दिले.

अध्यक्ष रश्मी बर्वे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची बैठक पार पडली. यावेळी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, सभापती उज्‍ज्वला बोढारे, तापेश्वर वैद्य, भारती पाटील, नेमावली माटे, वंदना बालपांडे, सीईओ योगेश कुंभेजकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

गोंडखैरी, आसोला, व्याहाड ग्रामपंचायतमध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेच्या माध्यमातून नळ लाईनची कामे करण्यात येत आहेत. कंत्राटदारांनी कामासाठी खोदकाम केले. परंतु ते बुजवले नाही.. त्यामुळे नागरिकांची मोठी अडचण होत आहे. यासंदर्भात कंत्राटदाराला विचारणा केली असता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नाही. हा मुद्दा आज स्थायी समितीच्या बैठकीत उपस्थित झाला. तेव्हा एक महिन्याच्या आत काम पूर्ण करण्याचे निर्देश बर्वे यांनी दिले. काम न केल्यास दोन हजार रुपये प्रतिदिवसाप्रमाणे दंड आकारण्याचे आदेशही दिले. तसेच वेळेत काम न करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचा निर्णयही घेण्यात आला.

तसेच जिल्हा परिषदेमार्फत होणाऱ्या पुलांकरिता २७ ते २९ टक्के कमी दराच्या निविदा आल्या. यामुळे निकृष्ट काम होण्याची शक्यता असल्याने सर्व निविदा रद्द करण्याचा निर्णय आज स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

१० टक्के निधी देण्यास समाजकल्याणला विसर

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत दलित विकास निधीअंतर्गत ग्रामपंचायत क्षेत्रात विविध कामे केली जातात. त्यात ९० टक्के निधी देण्यात आला. शेवटी १० टक्के निधी दिला जातो. मात्र अद्यापही निधी न मिळाल्याने ग्रामपंचायतीने त्या कामाचे उपयोगिता प्रमाणपत्र दिले नाही. त्यामुळे आता नव्याने मंजूर केलेल्या ग्रामपंचायतींना त्यात डावलण्यात आले. सदर चूक विभागाची असताना त्याचा फटका ग्रामपंचायतींना बसल्याने अध्यक्षांसह उपाध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली. त्यावर अध्यक्षा रश्मी बर्वे यांनी तातडीने निधी रिलीज करण्याचे निर्देश दिले.

...अखेर रस्त्यांची कामे सुरू

हिंगणा तालुक्यात समृद्धी महामार्गाचे काम मोठ्या धडाक्यात सुरू आहे. मात्र आजूबाजूच्या गावातील रस्त्यांची मोठी दुर्दशा झाली होती. यावर पदाधिकाऱ्यांनी गत काही महिन्यानंतर कंत्राटदारांच्या लक्षात आणून दिल्यानंतर, त्यांनी रस्त्यांची कामे सुरू केल्याची माहिती उपाध्यक्ष व बांधकाम सभापती मनोहर कुंभारे यांनी दिली.

अंगणवाडीला सावित्रीबाई फुले यांचे नाव

जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषदेद्वारा आयोजित केलेला जिल्हास्तरीय महिला मेळावा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करावा लागला. मात्र महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने अंगणवाड्यांना आदर्श व कर्तृत्ववान महिलांचे नाव देण्याचा अभिनव कार्यक्रम सुरू केला आहे. त्यात ६ मार्च रोजी डिगडोह (पांडे) येथील अंगणवाडीला सावित्रीबाई फुले यांचे नाव दिले जाणार आहे, अशी माहिती सभापती उज्ज्वला बोढारे यांनी दिली.

Web Title: Non-performing contractors are no longer doing well, be black listed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.