शहरं
Join us  
Trending Stories
1
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
2
चिनी शस्त्रे 'फुसकी' निघाली, पाकिस्तनाने अमेरिकेच्या दारात 'झोळी' पसरली; US च्या 'या' घात अस्त्रांवर पाकचा डोळा!
3
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
4
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
5
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
6
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
7
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
8
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
9
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
10
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
11
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
12
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
13
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
14
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
15
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
16
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
17
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
18
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
19
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
20
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण

बँक व विमा कंपनीच्या नावाआड फसवणूक

By admin | Updated: June 4, 2014 01:11 IST

बँक आणि विमा कंपनीचे अधिकारी असल्याची बतावणी करून चार भामट्यांनी एका व्यक्तीला एक कोटीचे आमिष दाखवले. विमा कंपनीची पॉलिसी आणि बोगस चेक देऊन या भामट्यांनी ‘त्या’ व्यक्तीला पावणेआठ

नागपूर : बँक आणि विमा कंपनीचे अधिकारी असल्याची बतावणी करून चार भामट्यांनी एका व्यक्तीला एक कोटीचे आमिष  दाखवले. विमा कंपनीची पॉलिसी आणि बोगस चेक देऊन या भामट्यांनी ‘त्या’ व्यक्तीला पावणेआठ लाखांचा गंडा घातला.  अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही फसवणुकीची घटना घडली.राहुल शर्मा, विकास सिसोदिया, विजय देसाई आणि पंकज भाटिया अशी आरोपींची नावे आहेत. १३ सप्टेंबर २0१३ ला यातील  एकाने ज्युलियन जॉय लिव्ह (वय ३९, रा. बालाजी मेन्शन अपार्टमेंट, महाराणा कॉलनी, अजनी) यांना फोन केला. तुम्ही  एसबीआय बँकेचे प्रीमियर पॉलिसीधारक आहात. त्यामुळे तुम्हाला १ लाख ८२ हजार रुपये मिळतील. मात्र, त्याकरिता तुम्हाला  आयएनजी वैश्य इन्शुरन्स कंपनीसोबत करार करून ४३,६२५ रुपयांची पॉलिसी काढावी लागेल, असे सांगितले. पॉलिसीची ही  रक्कम ९0 दिवसांत परत मिळेल, असेही सांगितले. १ लाख ८२ हजार रुपये मिळणार असल्याचे गृहित धरून ज्युलियन यांनी या  भामट्यांना पॉलिसी काढण्यास होकार दिला. ओळखपत्र आणि पत्त्याची कागदपत्रेही पाठवली. काही दिवसानंतर त्यांना रिलायन्स  आणि आयएनजी वैश्यच्या दोन पॉलिसी पाठविल्या. त्याबदल्यात आधी १ लाख ५0 हजारांचा धनादेश घेतला; नंतर तो कॅन्सल  करून दीड लाखांची रक्कम मागितली. ही रक्कम घेतल्यानंतर तुम्हाला कंपनीकडून एक कोटी रुपये मिळणार, असे दुसरे आमिष  दाखवले. विश्‍वास बसावा म्हणून २२ लाखांचा एक धनादेशही दिला. ज्युलियन यांनी तो बँकेत जमा केला असता बाऊन्स झाला.  आरोपींनी वेगवेगळी कारणे सांगून ज्युलियन यांची दिशाभूल केली आणि त्यांच्याकडून गेल्या नऊ महिन्यात ७ लाख ७९ हजार  ६७५ रुपये हडपले. स्वत:ला कंपनीचे अधिकारी सांगणारे हे भामटे प्रत्येक वेळी ज्युलियन यांना पैसे देण्याऐवजी त्यांच्याकडून पैसे  उकळत होते. त्यामुळे ज्युलियन यांना शंका आली. त्यांनी शहानिशा केली असता एसबीआय, रिलायन्स अथवा आयएनजीसोबत  उपरोक्त भामट्यांचा संबंध नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ज्युलियन यांनी सोमवारी अजनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.  पोलिसांनी राहुल शर्मा, विकास सिसोदिया, विजय देसाई आणि पंकज भाटिया या भामट्यांविरुद्ध कलम ४१९, ४२0 अन्वये गुन्हे  दाखल केले. (प्रतिनिधी)