शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

नागपूरच्या सिव्हिल लाईन्समधील ध्वनी प्रदूषणाचा न्यायमूर्तींना मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 10:42 PM

उच्च न्यायालयाच्या एका न्यायमूर्तींनी गेल्या सोमवारी सिव्हिल लाईन्समधील ध्वनी प्रदूषण व वाहतूक कोंडीची सदर पोलिसांकडे मौखिक तक्रार नोंदविल्याची पक्की माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. चक्क न्यायमूर्तींना अशी तक्रार करावी लागल्यामुळे पोलिसांवर स्वत:च्या कर्तव्यनिष्ठतेवर आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देपोलिसांकडे मौखिक तक्रार : पोलिसांना करावे लागेल आत्मचिंतन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उच्च न्यायालयाच्या एका न्यायमूर्तींनी गेल्या सोमवारी सिव्हिल लाईन्समधील ध्वनी प्रदूषण व वाहतूक कोंडीची सदर पोलिसांकडे मौखिक तक्रार नोंदविल्याची पक्की माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. चक्क न्यायमूर्तींना अशी तक्रार करावी लागल्यामुळे पोलिसांवर स्वत:च्या कर्तव्यनिष्ठतेवर आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.सिव्हिल लाईन्समधील सीपी क्लब येथे रात्री १० वाजतानंतरही मोठ्या आवाजात संगीत वाजवले जात होते. तसेच, या परिसरात वाहनांमुळे वाहतूक कोंडी झाली होती. याचा प्रचंड मनस्ताप झाल्यामुळे न्यायमूर्तींनी सदर पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ हालचाली करून संगीत थांबवले व वाहतूक मोकळी केली. तक्रारकर्ते न्यायमूर्तींनी उच्च न्यायालय व्यवस्थापकांना हा विषय पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्यासमक्ष मांडण्याचे निर्देशही दिले, अशी माहिती मिळाली आहे. पोलीस सूत्राच्या माहितीनुसार, शहरातील सर्व क्लबस्, लॉन्स व मंगल कार्यालयांना रात्री १० वाजतानंतर संगीत वाजविण्यास मनाई करणारे निर्देश पोलीस विभागाद्वारे जारी केले जाणार आहेत. तसेच, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. परंतु, पोलिसांनी केवळ काही दिवसांकरिता थातूरमातूर कारवाई करू नये. सर्व दिवस नियमांचे पालन होईल यासाठी गांभीर्याने प्रयत्न करावे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषणHigh Courtउच्च न्यायालय