शहरं
Join us  
Trending Stories
1
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
2
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
3
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
4
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
5
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
6
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
7
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
8
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
9
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
10
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
11
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
12
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
13
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
14
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
15
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
16
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
17
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
18
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
19
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
20
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

अखेर एम्सच्या मुलाखतीसाठी दिल्या ‘एनओसी’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 12:15 AM

लोकमत न्यूज  नेटवर्कनागपूर : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचा (एम्स) ५२ पदांना घेऊन ज्यांनी अर्ज केले त्यातील राज्यभरातील मेडिकल कॉलेजमध्ये कार्यरत ३५वर प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व अतिरिक्त प्राध्यापकांचे मुलाखतीसाठी आवश्यक असलेले नाहरकत प्रमाणपत्र (एनओसी) वैद्यकीय शिक्षण विभागाने थांबवून ठेवले होते. ‘लोकमत’ने याला वाचा फोडताच मुलाखतीच्या एक दिवसापूर्वी म्हणजे शुक्रवारी ...

ठळक मुद्देवैद्यकीय शिक्षण विभाग : वेळेवर एनओसी मिळाल्याने उडाली तारांबळ

लोकमत न्यूज  नेटवर्कनागपूर : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचा (एम्स) ५२ पदांना घेऊन ज्यांनी अर्ज केले त्यातील राज्यभरातील मेडिकल कॉलेजमध्ये कार्यरत ३५वर प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व अतिरिक्त प्राध्यापकांचे मुलाखतीसाठी आवश्यक असलेले नाहरकत प्रमाणपत्र (एनओसी) वैद्यकीय शिक्षण विभागाने थांबवून ठेवले होते. ‘लोकमत’ने याला वाचा फोडताच मुलाखतीच्या एक दिवसापूर्वी म्हणजे शुक्रवारी सर्वांनाच ‘एनओसी’ देण्यात आल्या. वेळेवर एनओसी देण्यात आल्याने वैद्यकीय शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर अनेकांनी बोट ठेवले.आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या जवाहरलाल पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्थेने ‘एम्स’साठी आवश्यक असलेल्या पदांसाठी जाहिरात काढली. यात ‘अ‍ॅनाटॉमी’, ‘फिजिओलॉजी’, ‘बायोकेमेस्ट्री’, ‘कम्युनिटी मेडिसीन’, ‘पॅथालॉजी’, ‘मायक्रोबॉयलॉजी’, ‘फार्माकॉलॉजी’ व ‘फॉरेन्सिक’ विद्याशाखेसाठी आठ प्राध्यापक, चार अतिरिक्त प्राध्यापक, चार सहयोगी प्राध्यापक, १६ सहायक प्राध्यापक, १२ वरिष्ठ निवासी डॉक्टर तर आठ ट्युटर्स असे मिळून ५२ पदांचा समावेश आहे. देशभरातून अनेकांनी या पदासाठी अर्ज केले आहेत. यात महाराष्टÑातील मेडिकल महाविद्यालयांमध्ये कार्यरत अध्यापकांच्या अर्जांची संख्या सर्वाधिक आहे. १६ जूनपासून या पदांसाठी मुलाखती घेतल्या जाणार आहेत. परंतु मुलाखतीचा दिवस तोंडावर असताना आणि मोजक्याच अध्यापकांना ‘एनओसी’ मिळाल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. यातच वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवांनी मेडिकलमध्ये अध्यापकांचा रिक्त जागा व ‘एम्स’मध्ये त्यांची निवड झाल्यास त्यात भर पडण्याची शक्यता असल्याचे आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित व रुग्णहित अडचणीत येण्याचे कारण दिले. यामुळे वातावरण तापले. यावर संचालकांनी रिक्त पदाची समस्या निर्माण होणार नाही असे पत्र देऊन एनओसी देण्याची शिफारस केली. परंतु त्यानंतरही एनओसी देण्यास टाळाटाळ केली जात होती. या संदर्भाचे वृत्त ‘लोकमत’ने ‘एम्सच्या मुलाखतीसाठी एनओसीची प्रतीक्षा’ या मथळ्याखाली प्रसिद्ध केले. वृत्ताची दखल घेऊन शुक्रवारी १५ जून रोजी सर्वांना ‘एनओसी’ देण्यात आल्या. यामुळे अनेकांचा जीव भांड्यात पडला. ‘एनओसी’साठी ताटळत ठेवून मुलाखतीपासून वंचित ठेवण्याचा हा प्रकार आमच्या अधिकारांवर निर्बंध आणणारा आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया अनेकांच्या होत्या.

टॅग्स :Medicalवैद्यकीयnagpurनागपूर