नागपूर : मतदार यादीत नाव नसल्याने शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अनेक पदवीधरांना आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान न करता आल्याने संताप व्यक्त केला. दुसकरीडे काही मतदारांना घरापासून लांब अंतरावरील मतदान कें द्र मिळल्याने मतदारांचा गोंधळ उडाला होता. सदर भागातील कस्तुरबा वाचनालय मतदार केंद्रावर मतदानासाठी आलेल्या अनेक पदवीधरांना मतदार यादीत नाव नसल्याने मतदान करता आले नाही. यादीत नावाचा समावेश व्हावा यासाठी आवश्यक कागदपत्रासह अर्ज सादर केला. परंतु त्यानंतरही यादीत नाव नसल्याची तक्र ार पदवीधरांनी केली. हुडकेश्वर भागातील पदवीधरांना नजीकचे केंद्र न देता त्यांना दिघोरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज येथील मतदान केंद्र देण्यात आले. सक्करदरा व तुकडोजी चौक परिसरात मतदान केंद्र असताना काही मतदारांना दिघोरी येथील मतदान केंद्र मिळाल्याने अनेकांनी मतदानाला जाण्याचे टाळले. दुपारी २ च्या सुमारास या मतदान केंद्राला भेट दिली असता केंद्रावरील १३५२ मतदानापैकी जेमतेम २५३ मतदान झाले होते. मेडिकल चौकातील पं. बच्छराज व्यास विद्यालयात सकाळी पहिल्या दोन तासात ७ टक्के मतदान झाले होते. बिंझाणी महाविद्यालय केंद्रावरही अशीच परिस्थिती होती. इतवारी भागातील निखालस हायस्कूल येथीही अशीच परिस्थिती होते. कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी मनपाच्या सिव्हिललाईन मुख्यालयात मतदान केंद्र ठेवण्यात आले होते. या केंद्रावर जेमतेम २१ टक्के मतदान झाले. मतदारात निरु त्साह दिसून आला. राजकीय पक्षाचे कार्यकर्तेही मन लावून कामाला लागले नव्हते. काही मतदान केंद्रावरील बुथवर कर्मचाऱ्यांची वर्दळ दिसून आली. काही शिक्षक संघटनांचे नेते सक्रिय होते. त्यांनी अशाच उत्साहाने विद्यार्थ्यांना शिकविले तर शाळांतील निकाल बदलू शकतात, अशी प्रतिक्रिया जागरूक मतदार व्यक्त करीत होते. (प्रतिनिधी)
नाव नसल्याने तर कुठे दूरच्या केंद्रामुळे गोंधळ!
By admin | Updated: June 21, 2014 02:37 IST