शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

एनआयएवर विश्वास नाही, सीआयडीमार्फत व्हावा तपास : आनंदराज आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 22:33 IST

कोरेगाव भीमा हल्ला प्रकरणात मनोहर भिडे व मिलिंद एकबोटे हेच खरे सूत्रधार असून त्यांना वाचवण्यासाठीच या हल्ल्याची चौकशी केंद्र सरकारने एनआयएकडे सोपवली आहे.

ठळक मुद्देकोरेगाव-भीमा हल्ला प्रकरण, देवेंद्र फडणवीस यांच्या चौकशीचीही मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरेगाव भीमा हल्ला प्रकरणात मनोहर भिडे व मिलिंद एकबोटे हेच खरे सूत्रधार असून त्यांना वाचवण्यासाठीच या हल्ल्याची चौकशी केंद्र सरकारने एनआयएकडे सोपवली आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी राज्य सरकारने सीआयडीमार्फत करावी, त्यात केंद्र सरकारने हस्तक्षेप करू नये. तसेच या प्रकरणात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी सोमवारी पत्रपरिषदेत केली.आनंदराज आंबेडकर म्हणाले, कोरेगाव भीमा हल्ल्याचे मूख्य सूत्रधार मनोहर भिडे व मिलिंद एकबोटे आहेत. मागच्या भाजपच्या सरकारने त्या हल्ल्याला शहरी नक्षलवादाशी जोडून वेगळेच स्वरूप देण्याचा घाट घातला होता. सध्याच्या महाविकास आघाडीच्या सरकारने या प्रकरणाची नव्याने चौकशी लावताच केंद्र सरकारने आरोपींना वाचवण्यासाठी एनआयएकडे तपास सोपवला.आनंदराज आंबेडकर म्हणाले, देशातील अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. शासकीय कंपन्या विकल्या जात आहेत. आपल्या अपयशावर पांघरूण घालण्यासाठी सीएएसारखे नको असलेले कायदे लादले जात आहेत. देशात अघोषित आणीबाणी लादली गेली आहे. परंतु या देशातील तरुण लोकशाही व संविधानाच्या संरक्षणासाठी उभा झाला आहे, आम्ही या तरुणांसोबत आहोत. यावेळी त्यांनी राज्य सरकारवरही टीका केली. राज्यातील तीन वेगवेगळ्या विचारांचे पक्ष केवळ सत्तेसाठी एकत्र आले आहेत. त्यांचे विचारा अजूनही जुळले नसल्याने सरकारच्या कामालाही सुरूवात होऊ शकली नाही. पत्रपरिषदेला रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष सागर डबरासे, महासचिव कुमार कुरतडीकर उपस्थित होते.आंबेडकरी चळवळीच्या स्वतंत्र राजकीय अस्तित्वासाठी बाहेरराज्यात आंबेडकरी चळवळीचे स्वतंत्र राजकीय अस्तित्व निर्माण करण्याच्या उद्देशाने रिपब्लिकन सेना कार्य करणार आहे. यासाठीच आपण वंचित बहुजन आघाडीमधून बाहेर पडलोय. परंतु संघटना मजबूत केल्याशिवाय हे शक्य नाही. त्यामुळे अगोदर संघटना मजबूत करण्यावर आपला भर आहे. आपल्याला लोकांकडून मोठे समर्थन मिळत आहे. विविध आंबेडकरी संघटनांमधील कार्यकर्ते आमच्या पक्षात येत असल्याचे आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले.

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारNIAराष्ट्रीय तपास यंत्रणा