शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
5
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
6
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
7
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
8
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
9
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
10
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
11
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
12
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
13
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
14
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
15
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
16
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
17
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
18
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
19
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
20
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

शुल्क भरले नाही म्हणून सेंटर पॉईंट शाळेकडून विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2021 20:46 IST

Center Point School , High court शुल्क न भरल्यामुळे सेंटर पॉईंट शाळेने एका विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द केला. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सेमिनरी हिल्स येथील सेंटर पॉइंट शाळेचे मुख्याध्यापक आणि राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचे सचिव, सीबीएसई सचिव, शिक्षण उपसंचालक व जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना नोटीस बजावली आहे.

ठळक मुद्देउच्च न्यायालयाने बजावली नोटीस : दोन आठवड्यांत मागितले उत्तर

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शुल्क न भरल्यामुळे सेंटर पॉईंट शाळेने एका विद्यार्थ्याचा प्रवेश रद्द केला. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सेमिनरी हिल्स येथील सेंटर पॉइंट शाळेचे मुख्याध्यापक आणि राज्याच्या शालेय शिक्षण विभागाचे सचिव, सीबीएसई सचिव, शिक्षण उपसंचालक व जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना नोटीस बजावली आहे. शाळेने दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

या प्रकरणावर न्यायमूर्ती अविनाश घरोटे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. सार्थक अग्रवाल असे विद्यार्थ्याचे नाव आहे. शाळेच्या कारवाईविरुद्ध सार्थकचे पालक संदीप व दीप्ती अग्रवाल यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सार्थक गेल्या शैक्षणिक वर्षात इयत्ता चौथीला होता. शाळेच्या मुख्याध्यापकांनी याचिकाकर्त्यांना नोटीस पाठवून डिसेंबर-२०२० पर्यंतचे शुल्क २३ एप्रिल २०२१ पर्यंत भरण्यास सांगितले होते. अन्यथा सार्थकला शाळेतून काढून टाकण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार शुल्क जमा न केल्यामुळे २८ मे रोजी सार्थकची टीसी याचिकाकर्त्यांना परत देण्यात आली. त्यावर याचिकाकर्त्यांचा आक्षेप आहे. शाळेची कृती अवैध असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सुनावणीदरम्यान त्यांनी न्यायालयाच्या प्रश्नाला उत्तर देताना थकीत शुल्क महिनाभरात जमा करण्याची तयारी दर्शविली. तसेच, टीसी रद्द करण्याची व सार्थकला इयत्ता पाचवीमध्ये प्रवेश देण्याची विनंती केली. न्यायालयाने ही बाब लक्षात घेता संबंधित प्रतिवादींना नोटीस बजावली. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. अश्विन इंगोले यांनी कामकाज पाहिले.

शाळेकडून नो कमेन्ट्स

यासंदर्भात शाळेच्या मुख्याध्यापिका शिल्पी गांगुली यांना लोकमतने संपर्क केला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. संबंधित प्रकरण न्यायालयात असल्याने त्यावर मी भाष्य करणार नाही, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयSchoolशाळा