शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
2
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
3
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
4
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?
5
"आधार, मतदान ओळखपत्र आणि रेशन कार्ड विश्वासार्ह कागदपत्रे नाहीत"; निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात धक्कादायक माहिती
6
"...असे जीवन जगत राहा"; 'मिसेस मुख्यमंत्र्यां'ची देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवशी खास पोस्ट
7
१२ कोटी रुपये, BMW आणि मुंबईत घर... पोटगीची मागणी ऐकून सुप्रीम कोर्ट म्हणालं,'तू कमवत का नाही?'
8
शेअर असावा तर असा...! ₹15 वरून ₹455 वर पोहोचला शेअर, आता मोठा व्हिस्की ब्रँड खरेदी करणार कंपनी!
9
Ajit Pawar Birthday: अजित पवारांचा असाही एक कार्यकर्ता, ११ एकर शेतजमिनीवर दादांचे चित्र रेखाटून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
10
२ मिनिटांत ₹१००० कोटींचा नफा; 'या' कंपनीच्या शेअरनं केली कमाल, मालकासह गुंतवणूकदारही मालमाल
11
सावधान...! १७ रुपयांपर्यंत घसरू शकतो या बँकेचा शेअर, २-२ तज्ज्ञांनी दिलाय विक्रीचा सल्ला; जाणून घ्या
12
मस्करीची कुस्करी! मी पडले तर तू मला वाचवशील? नवऱ्याला प्रश्न विचारला, कठड्यावरुन पाय घसरला
13
“माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी करण्याची हिंमत CM फडणवीस यांच्यात नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
राजीनामा-शासन भिकारी, माणिकराव कोकाटेंच्या विधानावर CM फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले...
15
वालाचं बिरडं आणि डाळिंब्यांची उसळ यात आहे छोटासा फरक; श्रावण विशेष पारंपरिक रेसेपी 
16
Video : चाकू काढला आणि ३२ हजारांचा लेहेंगा फाडला, दुकानदाराला म्हणाला, 'तुलाही असाच फाडेन'; कल्याणमधील व्हिडीओ व्हायरल
17
Post Office मध्ये जमा करा १ लाख, मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स व्याज; चेक करा डिटेल्स
18
प्राजक्ता माळीसोबत फोटो हवा म्हणून त्याने लिफ्टच थांबवली, पुढे काय घडलं? Video व्हायरल
19
कसोटीत सर्वाधिक मेडन ओव्हर्स टाकणारे टॉप ५ भारतीय गोलंदाज!
20
अदानी-महिंद्रासह दिग्गज स्टॉक्स गडगडले! सेन्सेक्स-निफ्टी सपाट; मात्र 'या' शेअरने केली कमाल!

‘नो स्टोन, नो फायर, वुई वाँट सीएए एव्हरीव्हेअर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 12:01 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमी असलेल्या नागपुरात रविवारी या कायद्याच्या समर्थनार्थ हजारो नागरिक रस्त्यावर उतरले व भव्य रॅलीच्या माध्यमातून या कायद्याच्या पाठीशी सामान्य जनता आहे, असा संदेश देण्यात आला.

ठळक मुद्देनागपूरकरांचा भव्य ‘हुंकार’आमचे समर्थन ‘सीसीए’ला!नागरिकत्व सुधारणा कायदा हवाच!दहा हजारांवर सर्वधर्मीय नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिस्तबद्ध चाल, घोषणांमधील एकवाक्यता, देशभक्तीचा हुंकार अन् भारतमातेचा जयघोष. कुणाचा धर्म वेगळा, कुणाचा पंथ वेगळा तर कुणाच्या हातातील झेंड्याच्या रंगदेखील वेगळा. परंतु सर्वांच्या तोंडी नाव देशाचेच. यशवंत स्टेडियम ते संविधान चौक या मार्गावर रविवारी सकाळच्या सुमारास जागोजागी हेच चित्र होते. नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन देशभरातील राजकारण तापले असून या कायद्याचा अनेकांनी विरोधदेखील केला. परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमी असलेल्या नागपुरात रविवारी या कायद्याच्या समर्थनार्थ हजारो नागरिक रस्त्यावर उतरले व भव्य रॅलीच्या माध्यमातून या कायद्याच्या पाठीशी सामान्य जनता आहे, असा संदेश देण्यात आला.हिवाळी अधिवेशनाच्या काळात सीएएच्या विरोधात मुस्लीम समाजाने लक्षवेधी मोर्चा काढल्यानंतर, त्याला प्रत्युत्तर म्हणून लोकाधिकार मंचच्या नेतृत्वात सीएएच्या समर्थनात मार्च काढण्यात आला. यशवंत स्टेडियम येथून सुरू झालेल्या या मार्चमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकाचा हातात तिरंगा, भारतीय जनता पक्षाचा झेंडा, काहींजवळ रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा, तर कुठे भगवाही झळकताना दिसला. कुठे छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार तर कुठे मोदी, शहांचा जयघोषही होताना दिसला. यशवंत स्टेडियममधून निघालेली रॅली पंचशील चौक होत, संविधान चौकात पोहचली. रॅलीचा एक टोक संविधान चौकात तर दुसरे टोक पंचशील चौकात यावरून रॅलीची भव्यता दिसून आली. लोकाधिकार मंचने केलेल्या आवाहनावर जनसमुदाय सीएएच्या समर्थनात रस्त्यावर आला होता. या रॅलीमध्ये सर्वच जनसमुदायाचे लोक सहभागी झाले होते. रिपब्लिकन पक्षाचे निळे झेंडे त्याची प्रचिती देत होते. रॅलीत सहभागी झालेल्यांबरोबरच रस्त्याच्या दुतर्फाही लोकांनी गर्दी करून रॅलीला समर्थन दिले. रॅली संविधान चौकात पोहोचल्यावर सभेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी संविधान चौकात प्रचंड गर्दी झाली होती. रॅलीत महापौर संदीप जोशी, माजी ऊर्जा तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार विकास महात्मे, आमदार अनिल सोले, गिरश व्यास, मोहन मते, भाजपाचे शहर अध्यक्ष प्रवीण दटके, ग्रामीण अध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, नगरसेवक विक्की कुकरेजा, संजय बंगाले, बाल्या बोरकर यांच्यासह मोठ्या संख्येने महिला नगरसेवक व नगरसेविका सहभागी होत्या.महिलांनी केले रॅलीचे नेतृत्वया रॅलीमध्ये मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. पण रॅलीच्या नेतृत्वाची दोरी महिलांच्या हातात होती. प्रत्येक महिलेच्या हातात भगवा ध्वज व सीएएच्या समर्थनार्थ फलक झळकत होते. भारतमातेची वेशभूषा करून विद्यार्थिनी आणि भारत मातेचे पोस्टर्स रॅलीत होते. वंदेमातरम, भारत माता की जय, असा जयघोष सातत्याने महिलांकडून होत होता. माजी महापौर नंदा जिचकार, अर्चना डेहनकर, माया इवनाते यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने महिला रॅलीत सहभागी झाल्या होत्या.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक