शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

स्क्रब टायफसचा कीडा नाही ‘लारव्हा’ धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 01:21 IST

स्क्रब टायफस हा कीडा चावल्याने नाही तर त्याच्या ‘लारव्हा’चा शरीराशी संपर्क आल्याने धोकादायक ठरू शकतो. त्यावर वेळीच उपचार झाले नाही तर शरीरातील अवयव निकामी होते आणि मृत्यू होतो, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवई यांनी आरोग्य समितीच्या बैठकीत दिली.

ठळक मुद्देउंदरांवर ठेवा अंकुश : जि.प.च्या आरोग्य विभागाकडून सतर्कतेचे आवाहन

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्क्रब टायफस हा कीडा चावल्याने नाही तर त्याच्या ‘लारव्हा’चा शरीराशी संपर्क आल्याने धोकादायक ठरू शकतो. त्यावर वेळीच उपचार झाले नाही तर शरीरातील अवयव निकामी होते आणि मृत्यू होतो, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवई यांनी आरोग्य समितीच्या बैठकीत दिली.जि.प.चे उपाध्यक्ष शरद डोणेकर यांच्या अध्यक्षतेत आरोग्य समितीची बैठक पार पडली. बैठकीत सदस्यांनी स्क्रब टायफसच्या बाबतीत चिंता व्यक्त करीत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंदर्भात आरोग्य अधिकाऱ्यांना विनंती केली. यावेळी डॉ. सवई म्हणाले की, स्क्रब टायफसला झाडेझुडपे आणि उंदीर हे जबाबदार आहे. स्क्रब टायफसचा कीडा लारव्हा झाडेझुडपाला चिटकून राहतो. मानव या लारव्हाच्या संपर्कात आल्यास तो आजाराला बळी पडतो. कीडा चावल्याने स्क्रब टायफस होत नाही तर लारव्हा हा घातक असतो. उंदरामुळे हा आजार शहरात पसरत आहे. उंदीर हे झाडाझुडपातून फिरत असताना त्यांच्या शरीरावर हा लारव्हा बसतो. घरामध्ये उंदरांमुळे हा आजार पसरतो. डॉ. सवई यांनी ज्या रुग्णांना स्क्रब टायफस झाला आहे त्या रुग्णांच्या घराचे सर्वेक्षण केले असता, या बाबी आढळून आल्याचे ते म्हणाले.- जिल्ह्यात २१ रुग्ण, ५ मृत्यूनगरपालिकेच्या क्षेत्रात या आजाराचे ९ व ग्रामीण भागात १२ रुग्ण आढळले आहेत. यातील पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनेबरोबरच स्क्रब टायफसचे लक्षण आढळल्यास पॅरासिटॉमॉल टॅब्लेट, डॉक्सिसायक्लीन व अ‍ॅझीथ्रोमायसीन हे औषध घ्यावे. सर्व ग्रामीण आरोग्य केंद्रांमध्ये हे औषध उपलब्ध आहे.- ग्रा.पं. व नगरपालिकेने करावी उपाययोजना२ सप्टेंबर ते २ आॅक्टोबरदरम्यान स्वच्छ भारत अभियान गावागावात राबवायचे आहे. डेंग्यू, स्क्रब टायफस यासारख्या आजाराचा होत असलेला उद्रेक लक्षात घेता, ग्रा.पं.ने त्यांच्या हद्दीतील झाडेझुडपे तणनाशकाने नष्ट करावे. गटार, कचºयाचे उकीरडे, शेणाच्या उकीरड्यावर मॅलिथियम पाडवर टाकावे. नागरिकांनी घरातील व परिसरातील उंदरांची बिळे नष्ट करावीत. यासंदर्भातील उपाययोजना करण्यासंदर्भात सर्व ग्रा.पं., नगरपालिकांना सीईओंनी सूचना केल्या आहेत. त्यामुळे आजाराचे उद्रेक लक्षात घेता गावकºयांच्या आरोग्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन उपाध्यक्ष शरद डोणेकर यांनी केले आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदHealthआरोग्य