सातवीपर्यंत ऑनलाईन शिक्षणप्रणाली नको; बजरंग दलातर्फे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 21:12 IST2020-05-28T21:12:01+5:302020-05-28T21:12:29+5:30
लॉकडाऊनमुळे अनेक शाळांनी ऑनलाईन वर्ग घेण्याची तयारी केली आहे. तर अनेकांचे वर्ग सुरूदेखील झाले आहेत. मात्र यामुळे अनेक विद्यार्थ्यांना व कुटुंबीयांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षणप्रणाली नको अशी मागणी बजरंग दलातर्फे करण्यात आली आहे.

सातवीपर्यंत ऑनलाईन शिक्षणप्रणाली नको; बजरंग दलातर्फे मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊनमुळे अनेक शाळांनी ऑनलाईन वर्ग घेण्याची तयारी केली आहे. तर अनेकांचे वर्ग सुरूदेखील झाले आहेत. मात्र यामुळे अनेक विद्यार्थ्यांना व कुटुंबीयांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षणप्रणाली नको अशी मागणी बजरंग दलातर्फे करण्यात आली आहे.
शाळकरी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये असे कारण देत काही शाळांनी ऑनलाईन धडे देण्यास सुरुवात केली आहे. १२ वर्षाखालील विद्यार्थ्यांना यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सतत मोबाईलसमोर राहिल्याने डोकेदुखी, डोळ्यांची जळजळ, डोळे लाल होणे असे प्रकार होत आहेत. सोबतच पालकांना मोबाईल, इंटरनेट डेटा याचा खर्चदेखील करावा लागत आहे. लॉकडाऊनमुळे अगोदरच आर्थिक अडचणीत असताना हा भुर्दंडच बसतो आहे. त्यामुळे सातवपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन धडे नको अशी मागणी बजरंग दलाकडून करण्यात आली. याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नागपूर महानगर बजरंग दल विद्यार्थी प्रमुख रजनीश मिश्रा, बजरंग दल सहसंयोजक विशाल पुंज यांच्यासह प्रशांत मिश्रा, अभिषेक गुप्ता, प्रवीण बर्डे, विनय मेश्राम, कुणाल राघवानी, पिंकेश नाथानी प्रामुख्याने उपस्थित होते.