कुणीच सिग्नल तोडू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:08 IST2021-03-07T04:08:28+5:302021-03-07T04:08:28+5:30

३० वर्षांपासून ऑटो चालवतो. आपण सिग्नल तोडला की कसा मनस्ताप होतो अन् नंतर पोलिसांसमोर कशी गयावया करावी लागते, ते ...

No one should break the signal | कुणीच सिग्नल तोडू नये

कुणीच सिग्नल तोडू नये

३० वर्षांपासून ऑटो चालवतो. आपण सिग्नल तोडला की कसा मनस्ताप होतो अन् नंतर पोलिसांसमोर कशी गयावया करावी लागते, ते माहिती आहे. त्यावेळेत प्रवासीही उतरून जातात. फक्त एकच मिनिट सिग्नलवर उभे राहावे लागते. ते टाळण्यासाठी दिवसभराची कमाई दंडाच्या रूपात पोलिसांच्या हवाली करणे परवडणारे नाही. त्यामुळे मी कधीच सिग्नल तोडत नाही. कुणीच सिग्नल तोडू नये, असे सांगावेसे वाटते.

शंकर निमजे (ऑटोचालक)

---

स्वत:ला अडचणीत कशाला आणायचे?

एक मिनिटाचा विलंब टाळण्यासाठी सिग्नल तोडायचे अन् समोर उभ्या असलेल्या पोलिसाजवळ नंतर मनधरणी करीत अर्धा तास गमवायचा, हे आवडत नाही. सिग्नल तोडण्याचा प्रकार म्हणजे स्वत:च स्वत:ला अडचणीत आणणे होय.

प्रवीण कन्नावार (ऑटोचालक)

---

मुलेही तसेच करतील

अनेकदा मुलांना घेऊन जावे लागते. त्यांच्यासमोर आपण वाहतुकीचे नियम तोडले की नंतर तेसुद्धा मोठे होऊन तसेच करतील. त्यामुळे प्रत्येकानेच हे भान राखणे गरजेचे आहे. आपण नियमांचे पालन केले तर आपली मुलेही पालन करतील अन्यथा तेसुद्धा नियम पाळणार नाहीत.

डॉ. अशोक ढोबळे

---

Web Title: No one should break the signal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.