No one is serious about city buses in Nagpur | नागपुरात शहर बससंदर्भात कोणीही गंभीर नाही

नागपुरात शहर बससंदर्भात कोणीही गंभीर नाही

ठळक मुद्देसभापतींनी मागितली वेळ : आयुक्तांनी मंगळवारी बोलावले

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एसटी व खासगी बस सुरू झाल्यानंतरही शहर बससाठी शहरातील नागरिकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. १९० दिवसानंतरही बस सुरू न झाल्याने नागरिकांत रोष आहे. नाईलाज म्हणून ऑटो, ई-रिक्षा व टॅक्सीने प्रवास करावा लागत आहे. नागरिकांची समस्या विचारात घेता परिवहन सभापती बाल्या बोरकर यांनी सोमवारी आयुक्त राधाकृष्णन बी. यांना भेटण्यासाठी वेळ मागितली असता आयुक्तांनी त्यांना मंगळवारची वेळ दिली आहे. दुसरीकडे महापौर संदीप जोशी, स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांच्यासह पदाधिकाऱ्यानी मौन धारण केले असल्याने बस संदर्भात कोणीही गंभीर नसल्याचे दिसते.
शहर बस बंद असल्याने होत असलेला त्रास विचारात घेता नागरिकांची बस सेवा सुरू करण्याची मागणी असल्याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले. परंतु प्रशासन व पदाधिकाऱ्यांनी कोविड संक्रमण वाढण्याचा धोका असल्याने बस सुरू होणार नसल्याची भूमिका घेतली.
प्रकाशित वृत्ताची दखल घेत बाल्या बोरकर यांनी आयुक्तांना भेटण्यासाठी वेळ मागितली. आयुक्तांनी महत्वाच्या कामात व्यस्त असल्याने मंगळवारचा वेळ दिली. नागरिकांना होणारा त्रास विचारात घेता शहर बस सेवा सुरू झाली पाहिजे. संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करता येईल, असे बोरकर म्हणाले.

Web Title: No one is serious about city buses in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.