आता ऑक्सिजन बाहेरून आणण्याची गरज पडणार नाही ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:07 AM2021-06-19T04:07:40+5:302021-06-19T04:07:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ऑक्सिजन निर्मितीमध्ये आपण हळूहळू स्वयंपूर्ण होत आहोत. अनेक नवीन प्लँट सुरू होण्याच्या तयारीत आहेत. ...

No need to take oxygen out () | आता ऑक्सिजन बाहेरून आणण्याची गरज पडणार नाही ()

आता ऑक्सिजन बाहेरून आणण्याची गरज पडणार नाही ()

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ऑक्सिजन निर्मितीमध्ये आपण हळूहळू स्वयंपूर्ण होत आहोत. अनेक नवीन प्लँट सुरू होण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आता ऑक्सिजन आपल्याला बाहेरून आणण्याची गरज पडणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

पूर्व नागपुरातील पारडी येथील श्री. भवानी हॉस्पिटलमधील ऑक्सिजन प्लँटचे लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी आ. कृष्णा खोपडे, हॉस्पिटलचे अध्यक्ष पांडुरंग मेहर, उपमहापौर मनीषा धावडे, संजय भेंडे, चंदू पेंडके, प्रमोद पेंडके, अतुल कोटेचा आदी उपस्थित होते. याप्रसंगी गडकरी म्हणाले, ऑक्सिजन सिलेंडरची कमतरताही पडणार नाही अशी व्यवस्था करा. शेजारच्या हॉस्पिटलला लागणारा ऑक्सिजनही आपण पुरवू शकू एवढा ऑक्सिजन येथे निर्माण होणार आहे. या हॉस्पिटलमध्ये हृदय रुग्णांच्या शस्त्रक्रियेसाठी कॅथलॅब निर्माण करण्यासाठी लागणारा निधीही सीएसआर फंडातून उपलब्ध करून देऊ. तसेच ऑक्सिजन रिफिलिंग प्लँट लावण्यासही आपण सहकार्य करू.

याप्रसंगी हॉस्पिटलतर्फे कोरोना काळात यशस्वी सेवा देणाऱ्या डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक श्री भवानी माता सेवा समितीचे सचिव हरिदास वाडीभस्मे यांनी केले. तर आभार नितीन अरसपुरे यांनी मानले.

Web Title: No need to take oxygen out ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.