कोणताच चित्रपट ‘क्लासिक’ नसतो! रोहिणी हट्टंगडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 08:47 PM2019-07-13T20:47:41+5:302019-07-13T21:39:07+5:30

कुठलाच चित्रपट ‘क्लासिक’ नसतो किंवा तशा अंगाने बनविला जात नाही. चित्रपटाची धाटणी रसिकांच्या मनात दीर्घकाळ ठाण मांडून राहत असेल तर तो चित्रपट काही वर्षे लोटल्यानंतर ‘क्लासिक’ म्हटला जातो, असे मत प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी आज येथे व्यक्त केले. नागपुरात एका खासगी कार्यक्रमासाठी आल्या असता, त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

No movie is 'classic' ! Rohini Hattangadi | कोणताच चित्रपट ‘क्लासिक’ नसतो! रोहिणी हट्टंगडी

कोणताच चित्रपट ‘क्लासिक’ नसतो! रोहिणी हट्टंगडी

Next
ठळक मुद्देपात्र साकारताना ‘ट्रान्सफॉर्मेशन’ महत्त्वाचे

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : कुठलाच चित्रपट ‘क्लासिक’ नसतो किंवा तशा अंगाने बनविला जात नाही. चित्रपटाची धाटणी रसिकांच्या मनात दीर्घकाळ ठाण मांडून राहत असेल तर तो चित्रपट काही वर्षे लोटल्यानंतर ‘क्लासिक’ म्हटला जातो, असे मत प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी आज येथे व्यक्त केले. नागपुरात एका खासगी कार्यक्रमासाठी आल्या असता, त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
कोणतेही पात्र साकारताना ‘ट्रान्सफॉर्मेशन’ हा भाग महत्त्वाचा असतो. अनेक पात्रे आजवर हिंदी-मराठी चित्रपटांमध्ये साकारली आहेत. त्यात विविधांगी भूमिका रंगवल्या. एक नट म्हणून कोणतेही पात्र साकारणे, तेवढे कठीण नव्हते. किंबहुना, ते कोणत्याही नटाला कधीच कठीण नाही. मात्र, ती भूमिका रंगवताना त्यात तुम्ही स्वत:ला किती लपवू शकता आणि ते पात्र अशा तºहेने आकाराला आणू शकता, त्यावर अभिनयाचा कस लागतो. आजवर केलेल्या नाटक आणि चित्रपटांमध्ये मी स्वत:ला दिग्दर्शकावर सोपवत गेले आहे. अभिनेता किंवा अभिनेत्री हे स्वार्थी असतात. ते कायम स्वत:च्या कॅरेक्टरबद्दल विचार करत असतात. मात्र, दिग्दर्शक संपूर्ण चित्रपटाचा विचार करत असतो. अशा वेळी दिग्दर्शकाच्या भूमिकेतून चित्रपट केला तरच चित्रपट उत्तम बनत असल्याची भावना रोहिणी हट्टंगडी यांनी व्यक्त केली. वैदर्भीय कलावंतांना डावलल्या जात असल्याचे बोलले जाते. मात्र, ते साफ खोटे आहे. मी स्वत: मुंबईची नाही तर पुण्याची आहे. तुम्ही स्वत:ला सिद्ध कराल तर तुम्हाला कुणीच डावलू शकत नाही, असेही त्या यावेळी बोलल्या. याप्रसंगी चित्रपट दिग्दर्शक नरेश बिडकर, प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, विनोदी अभिनेता भारत गणेशपुरे उपस्थित होते.
आपल्या भाषेला मोठी होऊ द्या : भारत गणेशपुरे
विदर्भातून साहित्याचा धूर उडत राहिला आहे. मात्र, आपली भाषा आजवर पोहोचली नाही. आता वैदर्भीय भाषा अमेरिका, इंग्लंडमधील मराठी भाषिक चवीने बोलण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे, आपल्या भाषेची कुणी खिल्ली वगैरे उडवत असेल असे तुम्हाला वाटते, तर खुशाल उडवू द्या. त्यामुळे, आपल्या भाषेचा व्यापच वाढणार आहे. वैदर्भीय बोलीभाषेला आणखी मोठी होऊ द्या, असे आवाहन प्रसिद्ध विनोदी अभिनेता भारत गणेशपुरे यांनी यावेळी केले.

Web Title: No movie is 'classic' ! Rohini Hattangadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.