शहरं
Join us  
Trending Stories
1
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
2
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
3
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
4
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
5
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
6
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
7
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
8
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
9
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
10
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
11
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
13
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
14
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
15
पंकजा मुंडेंनी घेतली मयत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी...
16
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
17
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात
18
सोन्याच्या दरात मोठी घसरण! फक्त ४ दिवसांत ७,००० रुपयांहून अधिक स्वस्त; काय आहे कारण?
19
RO-KO च्या चाहत्यांसाठी खुशखबर! पुढील वनडे कधी खेळणार? जाणून घ्या तारीख...
20
समर्थक जिंदाबादच्या घोषणा देत असताना स्टेज कोसळला; बाहुबली नेते अनंत सिंह पडले खाली

तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 07:34 IST

मध्य नागपुरात काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांचा मध्य नागपुरातील ‘रोड शो’ बडकस चौकात येताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी यांना झेंडे दाखविले.

नागपूर : महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ रोड शो करणाऱ्या काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना संघ मुख्यालयाजवळील चौकात भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे दाखविले. प्रत्युत्तरात प्रियांका गांधी यांनी झेंडे दाखविणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या. मात्र, काहीही केले तरी येथे महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून येणार, असे वक्तव्यही झेंडे दाखविणाऱ्यांना उद्देशून त्यांनी केले. बडकस चौकात हा प्रकार घडला.  

मध्य नागपूर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांच्या प्रचारार्थ प्रियांका गांधी यांचा रोड शो होता. सायंकाळी ५:४० च्या सुमारास रॅली बडकस चौकात आली. येथील एका मिष्टान्न भांडारच्या इमारतीवर भाजपचे कार्यकर्ते उभे होते. त्यांनी प्रियांका यांना भाजपचे झेंडे दाखविले. ते पाहून त्यांनी त्यांना नमस्कार केला. तसेच माईक हातात घेऊन ‘झेंडे दाखविणाऱ्या  कार्यकर्त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. मात्र, काही केले तरी येथे मविआचाच  उमेदवार निवडून येणार,’ असे  वक्तव्य त्यांनी केले. 

दुसरीकडे उजव्या बाजूला भाजपचे कार्यकर्ते प्रचार रॅली घेऊन पुढे जात होते. त्यांनी तिथेच थांबून घोषणाबाजी सुरू केली. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने  येथे काहीशी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. कार्यकर्ते जुमानत नसल्याने त्यांना पोलिसांनी मागे रेटण्यास सुरुवात केली. दरम्यान, १५ मिनिटांनंतर वातावरण शांत झाले. 

बहिणींनो, तुम्ही देश बदलवू शकता, सत्ता बदला

देसाईगंज (जि. गडचिरोली) : बहिणींनो, ही निवडणूक तुमच्या मुद्यांवर, तुमच्या समस्यांवर लढली जायला हवी. पाणी, वीज, महागाई, बेरोजगारी या तुमच्या समस्या आहेत. तुम्ही या देशाची जनता आहात आणि तुमचा विकास होतोय की नाही, हा सर्वांत मोठा प्रश्न आहे. माझ्या बहिणींनो, तुम्ही या देशाची शक्ती आहात. स्वत:ला कमजोर समजू नका. स्वत:ची शक्ती ओळखा. तुम्ही देश बदलवू शकता. सत्ता बदला, अशी भावनिक साद काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी घातली.

आम्ही बोलायला गेलो तर त्यांना भिवापुरी मिरची झोंबते!

उमरेड : पैशाच्या भरवशावर वाट्टेल ते केले. या सरकारने १६ लाख कोटी रुपये श्रीमंतांचे माफ केले. शेतकऱ्यांवर अन्याय केला, अशा शब्दांत तोफ डागत आम्ही बोलायला गेलो तर भिवापुरी मिरची झोंबते असा प्रहार काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सरकारवर केला.

उमरेड, सांगली येथे खरगे यांनी रविवारी प्रचारसभा घेतल्या. लोकसभेत जनतेने धडा शिकवला. आता त्यांच्या सरकारला सत्तेत राहण्यासाठी बिहारचे नितीशकुमार आणि आंध्रचे चंद्राबाबू नायडू हे टेकू हवे आहेत. या दोघांनी माघार घेतली तर सरकार कोसळेल. ही कमाल महाराष्ट्राने केल्याचे ते म्हणाले.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४vidarbha regionविदर्भ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४nagpur-central-acनागपूर मध्यPriyanka Gandhiप्रियंका गांधीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी