गुंगीच्या औषधाची नोंदच नाही

By Admin | Updated: September 8, 2014 02:25 IST2014-09-08T02:25:18+5:302014-09-08T02:25:18+5:30

चहा, शितपेय किंवा दारूमध्ये गुंगीचे औषध टाकून लुटल्याचे, अत्याचार केल्याचे, अश्लील चित्रफित काढल्याच्या बातम्या वाचायला येतात...

No insane medicines | गुंगीच्या औषधाची नोंदच नाही

गुंगीच्या औषधाची नोंदच नाही

सुमेध वाघमारे नागपूर
चहा, शितपेय किंवा दारूमध्ये गुंगीचे औषध टाकून लुटल्याचे, अत्याचार केल्याचे, अश्लील चित्रफित काढल्याच्या बातम्या वाचायला येतात. नुकत्याच घडलेल्या ‘युग हत्याकांड’ प्रकरणात गुंगीचे औषध सुंगविल्यानंतर युग चांडकची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. समाजविघातकांकडून या औषधाचा घातक वापर होत असताना मात्र त्याच्या वापराच्या संदर्भात अन्न व औषध प्रशासन (एफडीए) कठोर भूमिका घेत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
‘शेड्युल एच वन’ मध्ये गुंगी आणणाऱ्या औषधांचा समावेश येतो. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय हे औषध मिळत नाही. परंतु अनेक औषध विक्रेते ओळखीच्या लोकांना, इस्पितळात काम करणाऱ्यांना विना डॉक्टरांच्या चिठ्ठीने हे औषध देत असल्याची धक्कादायक माहिती आहे. विशेष म्हणजे, अनेक इस्पितळांमध्ये या औषधांचा सर्रास वापर होतो. परंतु वापर झाल्यानंतर उरलेल्या औषधांची नोंद होत नाही. यामुळे समाजविघातकांना हे औषध सहज उपलब्ध होत आहे. ‘युग’च्या प्रकरणात युगचे अपहरण झाल्यानंतर त्याला ‘हॅलोथेन’ हे गुंगी आणणारे औषध रुमालातून नाकाला लावले असल्याची शक्यता आहे. भूलतज्ज्ञाच्या मते अनेक रुग्णालयात याचा सर्रास वापर होतो. साधारण ५० एमएलच्या काचेच्या बाटलीत मिळणारे हे एकमेव गुंगीचे औषध आहे. यामुळे त्याची हाताळणी सोपी होते. परंतु प्रत्येक रुग्णाला एवढ्या मोठ्या प्रमाणात हे गुंगीचे औषध दिले जात नाही. यामुळे उर्वरित औषध इस्पितळातच ठेवले जाते. परंतु औषध किती वापरले, किती उरले याची नोंद होत नाही. ही धक्कादायक बाब आहे. वापरलेली अशी औषधे इस्पितळातील परिचारिका, कर्मचारी यांच्या हातात असतात. ती यांच्याकडून दुसऱ्यांकडे जाण्याची दाट शक्यता असते. (प्रतिनिधी)

Web Title: No insane medicines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.