शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'नो-फ्लाय झोन'चा परिणाम विमानांवर; दोन नागपूर-दिल्ली विमाने २६ पर्यंत रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 14:18 IST

Nagpur : दिल्ली येथे २६ जानेवारी रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्याच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर काही भाग 'नो-फ्लाय झोन' जाहीर करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :दिल्ली येथे २६ जानेवारी रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्याच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर काही भाग 'नो-फ्लाय झोन' जाहीर करण्यात आला आहे. त्याचा परिणाम दिल्ली-नागपूर हवाई मार्गावर झाला आहे. हवाई सुरक्षेवरील निर्बंधांमुळे एअर इंडियाच्या दिल्ली-नागपूर दरम्यानची दोन उड्डाणे तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्यात आली आहेत. मात्र, इतर उड्डाणे त्यांच्या निश्चित वेळापत्रकानुसार सुरू राहणार आहेत.

एअर इंडियाची दिल्ली-नागपूर फ्लाईट नंबर एआय ४१५ दिल्ली विमानतळावरून सकाळी ६:२० वाजता उड्डाण घेऊन सकाळी ८:५ वाजता नागपूर विमानतळावर पोहोचते. हे विमान पुढील सहा दिवसांसाठी रद्द राहणार आहे. त्याचप्रमाणे नागपूरहून दिल्लीकडे जाणारी एअर इंडियाचे विमान क्रमांक एआय ४१६ सकाळी ८:४० वाजता नागपूरहून झेपावते आणि सकाळी १०:३० वाजता दिल्लीला पोहोचते. हे विमानही सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करण्यात आले आहे.

नागपूर-दिल्ली दरम्यान दररोज एकूण १६ विमानं असतात. यामध्ये एअर इंडियाचे ४ तर इंडिगो एअरलाइन्सच्या १२ विमानांचा समावेश आहे. दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी लागू करण्यात आलेल्या सुरक्षेच्या उपाययोजनांमुळे नागपूर-दिल्ली मार्गावरील २ विमान प्रभावित झाली आहेत. इतर उड्डाणांवर याचा कोणताही परिणाम झालेला नाही. तथापि, काही विमान विलंबाने उडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

रिहर्सल आणि सुरक्षा

प्रजासत्ताक दिनाच्या परेडची रिहर्सल आणि सुरक्षेच्या कारणास्तव दिल्लीच्या हवाई क्षेत्रात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे देशांतर्गत विमानसेवा देणाऱ्या प्रमुख विमान कंपन्यांनी २६ जानेवारीपर्यंत त्यांच्या काही नियमित उड्डाण सेवा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

"दिल्ली विमानतळावर 'नोटिस टू एअरमेन' पुढील सहा दिवसांसाठी सकाळी १०:२० ते दुपारी १२:४५ या वेळेत लागू राहणार आहे. २६ जानेवारी रोजी लाल किल्ल्यावर होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्यानंतरच विमानसेवा पूर्ववत होणार आहे. याच कारणामुळे नागपूरहून एअर इंडियाची काही उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. मात्र, दिल्लीला ये-जा करणाऱ्या इतर उड्डाणांवर याचा कोणताही परिणाम झालेला नाही."- आबिद रूही, वरिष्ठ विमानतळ संचालक, एमआयएल

English
हिंदी सारांश
Web Title : No-Fly Zone Impacts Flights: Nagpur-Delhi Flights Cancelled Until 26th

Web Summary : Republic Day security in Delhi causes 'no-fly zone'. Two Air India Nagpur-Delhi flights are cancelled until January 26th. Other flights operate as scheduled, but some delays are expected due to the restrictions.
टॅग्स :nagpurनागपूरdelhiदिल्ली