No errors found, had to call JCB | नाही सापडली त्रुटी, बोलवावा लागला जेसीबी 

नाही सापडली त्रुटी, बोलवावा लागला जेसीबी 

ठळक मुद्देकर्फ्यूमध्येही काम करताहेच महावितरणचे कर्मचारी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात कर्फ्यू आहे. लोकांना रस्त्यावर फिरण्यास मनाई आहे. परंतु मॉडेल मिल चौकात महावितरणचे कर्मचारी मात्र वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी काम करीत आहेत. तीन दिवसाच्या कामानंतरही त्रुटी आढळून आली नाही, अखेर जेसीबी बोलवावी लागली. दुसरीकडे या परिसरातील वीज पुरवठा बॅकफिडमुळे सुरळीत झालेला आहे.
बुधवारी रात्री येथे ३३ केव्ही व ११ केव्हीच्या अंडरग्राऊंड केबलमध्ये त्रुटी आली होती. गुरुवारी पोलिसांकडून काम करण्याची परवानगी घेऊन कामाला सुरुवात करण्यात आली. शुक्रवारी सायंकाळपर्यंत काम सुरू होते. खोदकाम करून ११ केव्ही केबलमध्ये जॉईंट मारून त्याला ठीक करण्यात आले. उपकार्यकारी अभियंता प्रसन्न श्रीवास्तव यांनी सांगितले की, १० फूट खोदल्यानंतरहा फॉल्ट दिसून आला नाही. त्यामुळे आणखी खोदावे लागणार आहे. त्यामुळे हे काम जेसीबीद्वारेच केले जाऊ शकते. पोलिसांकडून जेसीबी आणण्यासाठी परवानगीही घेण्यात आली आहे. रविवारी पुन्हा काम सुरू होईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काम करणारे कर्मचारी सावधगिरी बाळगून आहेत. मास्क घालूनच काम केले जात आहे. पाणी व सॅनिटायझरने वारंवार हात धुतले जात आहे. श्रीवास्तव यांच्या नेतृत्वात सहायक अभियंता प्रशांत चरपे, मनीष वाकडे व वसीम यांची टीम काम करीत आहे. कंत्राटदार सतीश बहादुरेसुद्धा आपल्या कर्मचाऱ्यांसह सहकार्य करीत आहेत.

वीज पुरवठा सुरळीत
प्रसन्न श्रीवास्तव यांनी सांगितले की, या कामाला खूप वेळ लागणार आहे. परंतु सध्याची परिस्थिती लक्षात घेता वीज पुरवठा खंडित होऊ दिलेला नाही. काम सुरू करण्यापूर्वीच या परिसराला दुसऱ्या लाईनवर (बॅक फिड) जोडण्यात आले. असे केले नसते तर म्हाडा सब-स्टेशनअंतर्गत येणाऱ्या कॉटन मार्केट, सुभाष रोड, गणेशपेठ आदी परिसरातील १५ हजारापेक्षा अधिक ग्राहकांना याचा फटका बसला असता. प्रभारी मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: No errors found, had to call JCB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.