डिमांडच नाही, कसा मिळणार लाभ?
By Admin | Updated: May 14, 2014 00:47 IST2014-05-14T00:47:43+5:302014-05-14T00:47:43+5:30
महानगरपालिकेच्यावतीने वेळेवर कर भरणार्यांना मालमत्ता करातील सामान्य करावर ४ टक्के सूट देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

डिमांडच नाही, कसा मिळणार लाभ?
मालमत्ता करात ४ टक्के सूट: ३१ मेच्या आधी कर भरणार्यांना मिळणार फायदा नागपूर : महानगरपालिकेच्यावतीने वेळेवर कर भरणार्यांना मालमत्ता करातील सामान्य करावर ४ टक्के सूट देण्याची घोषणा करण्यात आली आहे. परंतु मनपा प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे ही घोषणा पोकळच ठरली आहे. कारण, कर भरण्याची अंतिम तारीख ३१ मे आहे आणि १२ मे पर्यंत डिमांड नोटच वाटण्यात आलेले नाही. विशेष म्हणजे, तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी दावा केला होता की जो मालमत्ताधारक आपला वर्तमान कर भरेल त्याला लगेचच डिमांड नोट दिली जाईल. परंतु असे झाले नाही. एलबीटीचा फटका बसल्यानंतर मनपा प्रशासनाची झोप उडाली आणि त्यांनी मालमत्ता करावर आपले लक्ष केंद्रित केले. तरी डिमांड नोट देण्याचे काम डिसेंबरच्या शेवटपर्यंंत चालतच होते. त्यामुळे मागच्या वर्षी नागरिकांना सूट मिळू शकली नाही आणि यंदाही तशीच परिस्थिती दिसत आहे. नियमानुसार, ३१ मेच्या आधी मालमत्ता कर भरले तर सामान्य करात ४ टक्के सूट मिळते. ३0 जूनच्या आधी कर भरणार्यांनाही २ टक्के सूट देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. इतकेच नाही तर ३१ डिसेंबरपर्यंंत कर न भरल्यास दर महिन्याला २ टक्के दराने दंडाची वसुली करण्याचे प्रावधान यात करण्यात आले आहे. तरी डिमांड नोट पोहोचण्याच्या एक महिन्याच्या आत दंड वसूल करायचा नाही, असा निर्णय मनपा सभागृहात घेण्यात आला. मागच्या आर्थिक वर्षात ४१३ कोटी रुपयांचे डिमांड नोट जारी करण्यात आले होते. आधी अर्थसंकल्पात २२१ कोटी रुपयांच्या वसुलीचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. वाटलेल्या डिमांडचा आकडा बघून हे लक्ष्य २५0 कोटी करण्यात आले. परंतु पूर्ण शक्ती वापरूनही केवळ १८९ कोटी रुपयांचीच वसुली करता आली. आता २१ ते २३ मे दरम्यान शहरात २३ ठिकाणी शिबिर आयोजित करून वसुलीचे लक्ष्य निर्धारीत करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)