नारसिंगीचे सरपंच कृष्णा उईके यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:09 IST2021-02-11T04:09:17+5:302021-02-11T04:09:17+5:30
जलालखेडा : जलालखेडा नजीकच्या नारसिंगी नायगाव (ठाकरे) या गट ग्रामपंचायतचे सरपंच कृष्णा उईके यांच्याविरुद्ध ग्रा.पं.च्या विशेष सभेत अविश्वास ठराव ...

नारसिंगीचे सरपंच कृष्णा उईके यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव
जलालखेडा : जलालखेडा नजीकच्या नारसिंगी नायगाव (ठाकरे) या गट ग्रामपंचायतचे सरपंच कृष्णा उईके यांच्याविरुद्ध ग्रा.पं.च्या विशेष सभेत अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला आहे. नजीकच्या नारसिंगी नायगाव (ठाकरे) या गट ग्रामपंचायतमधील सरपंच, सचिव यांच्या कार्यपद्धतीवर उपसरपंच व सदस्य यांनी आक्षेप घेतला होता. सरपंच कृष्णा उईके विकास कामामध्ये उपसरपंच व सदस्य यांना विश्वासात न घेता काम करतात व मनमानी कारभार करीत असल्याची तक्रार तहसीलदार व गटविकास अधिकारी नरखेड यांच्याकडे करण्यात आली होती. ३ फेब्रुवारी २०२१ ला सरपंच कृष्णा उईके यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव घेण्याबाबतचा प्रस्ताव तहसीलदार यांच्याकडे पाठविण्यात आला होता. त्या प्रस्तावाच्या आधारे तहसीलदारांनी ९ फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत नारसिंगी येथे विशेष सभेचे आयोजन केले होते. या सभेमध्ये सहा सदस्यांनी सरपंच कृष्णा उईके यांच्याविरोधात मतदान केले. त्यामुळे ६ विरुद्ध १ या मतांनी सरपंच यांच्याविरोधात अविश्वास ठराव पारित झाला. ग्रामपंचायतमध्ये घेण्यात आलेल्या विशेष सभेला उपसरपंच मनोहर तायवाडे, ग्रामपंचायत सदस्य घनश्याम ठाकरे, सुनील बारई, संगीता काळे, दीपाली पराये, प्रतिभा पाचपोहर उपस्थित होते.