‘बिल नाही तर वीज नाही’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 11:39 PM2017-11-20T23:39:46+5:302017-11-20T23:48:28+5:30

‘महावितरण’च्या नागपूर परिक्षेत्रातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांकडून थकबाकी वसूल करण्यासाठी ‘शून्य थकबाकी’ मोहीम मंगळवारी २१ नोव्हेंबरपासून सर्वत्र मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात येत आहे.

'No bill but no electricity' | ‘बिल नाही तर वीज नाही’

‘बिल नाही तर वीज नाही’

googlenewsNext
ठळक मुद्देमहावितरणकडून थकबाकीदारांची ‘वीजतोड’ मोहीमनागपूर परिक्षेत्रात २०९ कोटी ६५ लाख रुपयांची थकबाकी

आॅनलाईन लोकमत
नागपूर : ‘महावितरण’च्या नागपूर परिक्षेत्रातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांकडून थकबाकी वसूल करण्यासाठी ‘शून्य थकबाकी’ मोहीम मंगळवारी २१ नोव्हेंबरपासून सर्वत्र मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याने ग्राहकांनी त्यांच्याकडील थकीत वीजबिलाचा लगेच भरणा करून कारवाई टाळावी, असे महावितरणने म्हटले आहे.
महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रातील नागपूर, अकोला, अमरावती, चंद्रपूर आणि गोंदिया या पाचही परिमंडळातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांकडे तब्बल २०९ कोटी ६५ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्याच्या वसुलीसाठी महावितरणने जोरदार तयारी सुरू केली आहे. ‘बिल नाही तर वीज नाही’ हा संदेश देत थकबाकीदारांवर कारवाई करण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्याची पथके निर्माण करून वसुली मोहीम राबविली जाणार आहे. ज्यांनी वीज बिल भरलेले नाही, त्यांचे कनेक्शन तोडण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहे.
सप्टेंबर २०१७ अखेरीस महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रांतर्गत ३९ लाखांहून अधिक घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहक असून त्यांच्याकडील जिल्हावार थकबाकी - अकोला (३२.३७ कोटी), बुलडाणा (२९.०६ कोटी), वाशिम (२१.५१ कोटी), अमरावती (३२.४७ कोटी), यवतमाळ (२७.६६ कोटी), चंद्रपूर (१०.९६ कोटी), गडचिरोली (५.९४ कोटी), भंडारा (६.४३ कोटी), गोंदिया (१२.९९ कोटी), नागपूर (२७.३९ कोटी) तर वर्धा (९.४ कोटी) अशी एकूण २०९ कोटी ६५ लाख रुपयांवर थकबाकी असून, ग्राहकांनी त्यांच्याकडील थकबाकी त्वरित भरून वीजपुरवठा खंडित होण्याची कारवाई टाळावी.
थकीत वीज बिल भरण्यासाठी स्थानिक वीज बिल भरणा केंद्रांसह घरबसल्या ‘आॅनलाईन’ पेमेंटसाठी ‘महावितरण’च्या  वेबसाईट तसेच मोबाईल अ‍ॅपचा पर्याय उपलब्ध आहे.

१९,५४४ थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित
मागील आठवड्यात महावितरणने थकबाकीदारांविरोधात राबविलेल्या मोहिमेत थकीत वीज बिलांचा भरणा न करणाऱ्या नागपूर परिक्षेत्रातील १९ हजार ५४४ ग्राहकांचा वीजपुरवठा ८ कोटी ९१ लाखांच्या थकबाकीपोटी खंडित केला होता. यात नागपूर परिमंडळ - ५ हजार ८४६ (१ कोटी ७२ लाख), अकोला परिमंडळ- ४ हजार ९८५ (३ कोटी), अमरावती परिमंडळ - ५ हजार ६२१ (३ कोटी १३ लाख), चंद्रपूर परिमंडळ - १ हजार ५९३ ( ६३ लाख) तर गोंदिया परिमंडळात १ हजार ४३३ ग्राहकांचा (५४ लाख) वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.

Web Title: 'No bill but no electricity'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.