मनपाचा २७ मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प

By Admin | Updated: August 28, 2016 01:59 IST2016-08-28T01:59:58+5:302016-08-28T01:59:58+5:30

उपराजधानीला मॉडेल सोलर सिटी रूपाने विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी महापालिके च्या इमारती,

NMC's 27 MW Solar Power Project | मनपाचा २७ मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प

मनपाचा २७ मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प

नागपूर : उपराजधानीला मॉडेल सोलर सिटी रूपाने विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी महापालिके च्या इमारती, कार्यालये, शाळा, हॉस्पिटल, पाणीपुरवठा केंद्र व खुल्या जागांवर २७ मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा संयंत्र (सोलर फोटो व्होल्टाईक पावर पॅक) उभारण्याची योजना राबविली जात आहे. या प्रकल्पावर २३८ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

या प्रकल्पावरील चर्चा प्राथमिक स्तरावर आहे. स्थायी समितीच्या पुढील बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी घेतल्यानंतर सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला जाईल. त्यानंतर प्रकल्प अहवाल तयार केला जाईल.
या प्रकल्पाला केंद्र सरकारच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाकडून ३० टक्के अनुदान मिळण्याची आशा आहे. उर्वरित ७० टक्के खर्च हा उत्पादित विजेमुळे बिलाच्या रकमेच्या बचतीतून केला जाणार आहे. २७ मेगावॅट ऊर्जा निर्मिती प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यास हा प्रकल्प महापालिकेसाठी एक वरदान ठरण्याची शक्यता आहे.शहरातील प्रमुख रस्त्यांवरील हायमास्ट व मोठ्या मैदानावरील दिवे,पथदिवे ऊर्जा कार्यक्षम एलईडी पथदिव्यांनी बदलण्याचे कामाला सुरुवात करण्यात आली आहे. महापालिके ला दर महिन्याला वीज बिलावर १० कोटी खर्च करावे लागतात. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास भविष्यात महापालिकेचा दर महिन्याचा १० कोटींचा खर्च वाचणार आहे. (प्रतिनिधी)

१६३५ वॉटर हिटरचे वाटप रखडले
मॉडेल सौर सिटी प्रकल्पांतर्गत शहरातील सामान्य नागरिकांना सौरऊर्जेवरील वॉटर हिटर वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ३४५० नागरिकांना ९.३८ कोटींचे सौरऊर्जेवरील वॉटर हिटर वितरित केले जाणार होते. परंतु यातील १८१५ वॉटर हिटर वितरित करण्यात आले आहेत. परंतु उर्वरित १६३५ वॉटर हिटरसाठी केंद्र सरकारकडून अद्याप अनुदान अप्राप्त आहे. त्यामुळे महापालिकेने स्वखर्चातून सोलर वॉटर हिटर वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी मिळाल्यानंतर तो सभागृहात मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे.

Web Title: NMC's 27 MW Solar Power Project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.