शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

सेंटर पॉईंट स्कूल इंटरनॅशनलमध्ये पोहोचले महापालिकेचे पथक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 23:53 IST

सेंटर पॉईंट स्कूल इंटरनॅशनलच्या इमारतीच्या बांधकामाबाबत वाढत्या दबावात गुरुवारी महापालिकेचे पथक सेमिनरी हिल्स येथील बांधकामाची पाहणी करण्यासाठी पोहोचले. दरम्यान त्यांनी शाळा व्यवस्थापनाकडे बांधकामाशी निगडित कागदपत्र मागितले. पथकात सहभागी अधिकाऱ्यांनुसार शाळा व्यवस्थापन कोणतेच कागदपत्र देऊ शकले नाही. शाळा प्रशासनाकडून इमारतीचा मंजूर आराखडा व नकाशासह इतर कागदपत्र न मिळाल्यामुळे शाळेला नोटीस जारी करून बांधकाम थांबविण्याची तयारी महापालिकेने केली आहे.

ठळक मुद्देबांधकाम स्थळाची केली पाहणी : इमारतीशी निगडित कागदपत्र मागितलेशाळा व्यवस्थापन देऊ शकले नाही कागदपत्र

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सेंटर पॉईंट स्कूल इंटरनॅशनलच्या इमारतीच्या बांधकामाबाबत वाढत्या दबावात गुरुवारी महापालिकेचे पथक सेमिनरी हिल्स येथील बांधकामाची पाहणी करण्यासाठी पोहोचले. दरम्यान त्यांनी शाळा व्यवस्थापनाकडे बांधकामाशी निगडित कागदपत्र मागितले. पथकात सहभागी अधिकाऱ्यांनुसार शाळा व्यवस्थापन कोणतेच कागदपत्र देऊ शकले नाही. शाळा प्रशासनाकडून इमारतीचा मंजूर आराखडा व नकाशासह इतर कागदपत्र न मिळाल्यामुळे शाळेला नोटीस जारी करून बांधकाम थांबविण्याची तयारी महापालिकेने केली आहे.निरीक्षण पथकाचे नेतृत्व करणारे महापालिकेच्या धरमपेठ झोनचे उप अभियंता नितीन झाडे यांनी या बातमीची पुष्टी केली. त्यांनी सांगितले की, प्राथमिकदृष्ट्या त्यांना इमारतीचे सुरु असलेले बांधकाम नियमानुसार दिसले नाही. निरीक्षणादरम्यान शाळा व्यवस्थापनाला कागदपत्र मागण्यात आले होते. परंतु ते मिळाले नाहीत. उल्लेखनीय म्हणजे सेंटर पॉईंट स्कूल इंटरनॅशनलबाबत ‘लोकमत’ने अनेक खुलासे केले आहेत. या खुलाशामुळे डोळे बंद केलेले महापालिकेचे अधिकारी जागे झाले होते. ‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार हे प्रकरण शांत करण्यासाठी नगर रचना विभागाच्या सहायक संचालकांनी २७ मार्च २०१८ रोजी सहायक आयुक्तांना पत्र लिहून शाळेचे निरीक्षण करण्यास सांगितले होते. सूत्रांनी सांगितले की, अधिकाऱ्यांनी शाळेची पाहणी केली नाही. दरम्यान ‘लोकमत’मध्ये सेंटर पॉईंट स्कूल इंटरनॅशनलबाबत एक आणखी खुलासा केल्यानंतर काही दिवसापूर्वी शाळेचे मुख्याध्यापक/व्यवस्थापनाला नोटीस जारी केली होती. नोटीसमध्ये शाळेच्या इमारतीच्या बांधकामाचा नकाशा व परवानगी व शाळेच्या मालकी हक्काशी निगडित कागदपत्र सादर करण्यास सांगितले होते.नोटीस देऊन विसरलेमहापालिकेने या शाळेला नोटीस दिल्यानंतर महापालिकेला या नोटीसचा विसर पडला. शाळा व्यवस्थापनानेही नोटीसनुसार महापालिकेला कागदपत्र सोपविले नाहीत. उलट कामाची गती वाढविली. गुरुवारी ‘लोकमत’ने नवा खुलासा केल्यानंतर महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी झोन अधिकारी व इतर विभागाच्या अधिकाऱ्यांना फटकारले. त्यानंतर आज महापालिकेच्या पथकाने शाळेचा दौरा केला. सोबतच कागदपत्रांची मागणीही केली.काम अद्यापही सुरू आहेसूत्रांनुसार महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या दौऱ्यानंतर व संकटानंतरही शाळेच्या व्यवस्थापनाने बांधकाम सुरुच ठेवले आहे.तर बांधकाम थांबणारधरमपेठ झोनचे उपअभियंता नितीन झाडे यांनी सांगितले की, त्यांनी शाळेला कागदपत्र तात्काळ सादर करण्याचे सक्त निर्देश दिले आहेत. शुक्रवारपर्यंत कागदपत्र न मिळाल्यास एमआरटीपी अ‍ॅक्ट कलम ५४ नुसार शाळेला नोटीस देऊन बांधकाम थांबविण्याचे निर्देश देण्यात येतील.

टॅग्स :Schoolशाळाnagpurनागपूर