मनपा स्थायी समिती अध्यक्षांची आज निवडणूक : पोहाणेंच्या निवडीवर होणार शिक्कामोर्तब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 00:37 IST2019-03-05T00:35:53+5:302019-03-05T00:37:50+5:30
महापालिकेच्या तिजोरीची जबाबदारी स्थायी समिती अध्यक्षाकंडे असते. २०१९-२० या वर्षासाठी अध्यक्षांची निवडणूक प्रक्रिया आज मंगळवारी होत आहे. अध्यक्षपदासाठी भाजपाने प्रदीप पोहाणे यांच्या नावाची घोषणा आधीच केली आहे. निवडणूक प्रक्रियेनंतर त्यांच्याकडे अधिकृतपणे तिजोरीची जबाबदारी सोपविली जाणार आहे. यासोबतच पोहाणे यांच्यापुढे तिजोरीत महसूल जमा करण्याचे व शहरातील विकास कामांना गती देण्याच्या आव्हानाला त्यांना सामोरे जावे लागणार आहे.

मनपा स्थायी समिती अध्यक्षांची आज निवडणूक : पोहाणेंच्या निवडीवर होणार शिक्कामोर्तब
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या तिजोरीची जबाबदारी स्थायी समिती अध्यक्षाकंडे असते. २०१९-२० या वर्षासाठी अध्यक्षांची निवडणूक प्रक्रिया आज मंगळवारी होत आहे. अध्यक्षपदासाठी भाजपाने प्रदीप पोहाणे यांच्या नावाची घोषणा आधीच केली आहे. निवडणूक प्रक्रियेनंतर त्यांच्याकडे अधिकृतपणे तिजोरीची जबाबदारी सोपविली जाणार आहे. यासोबतच पोहाणे यांच्यापुढे तिजोरीत महसूल जमा करण्याचे व शहरातील विकास कामांना गती देण्याच्या आव्हानाला त्यांना सामोरे जावे लागणार आहे.
अध्यक्षदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर लगेच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. निवडणूक प्रक्रिया एप्रिलपर्यंत चालण्याची शक्यता आहे. त्यानंतर अर्थसंकल्प सादर करण्याला फारसा कालावधी मिळणार नाही. अर्थसंकल्पाला विलंब झाला तर विकास कामे करताना अडचणीचे ठरणार आहे. कारण काही महिन्यांनी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार आहे. दोन्ही निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत विकास कामांना मंजुरी देता येणार नाही. त्यामुळे कामासाठी फारसा कालावधी मिळणार नाही. त्यांना टी-२० स्टाईलने कामे करावी लागतील, अन्यथा शहरातील विकास कामांना फटका बसण्याची शक्यता आहे.
अशी होईल निवडणूक प्रक्रिया
जिल्हाधिकारी पीठासीन अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडतील. सकाळी १०.३० ते ११ वाजेदरम्यात उमेदवारी अर्ज दाखल करणे व उमेदवारी मागे घेणे. त्यानंतर गरज भासल्यास मतदान होईल. त्यानंतर पीठासीन अधिकारी अध्यक्षांच्या नावाची घोषणा करतील.