निजामुद्दीन-सिकंदराबाद रेल्वेगाडी रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:11 IST2020-12-05T04:11:18+5:302020-12-05T04:11:18+5:30
नागपूर : रेल्वे प्रशासनाच्या निर्देशानुसार नागपूर विभागातून धावणारी रेल्वेगाडी क्रमांक ०२४३८/०२४३७ निजामुद्दीन-सिकंदराबाद-निजामुद्दीन सुपरफास्ट रेल्वेगाडी रद्द करण्यात आली आहे. रेल्वे ...

निजामुद्दीन-सिकंदराबाद रेल्वेगाडी रद्द
नागपूर : रेल्वे प्रशासनाच्या निर्देशानुसार नागपूर विभागातून धावणारी रेल्वेगाडी क्रमांक ०२४३८/०२४३७ निजामुद्दीन-सिकंदराबाद-निजामुद्दीन सुपरफास्ट रेल्वेगाडी रद्द करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनानुसार रेल्वेगाडी क्रमांक ०२४३८ निजामुद्दीन-सिकंदराबाद राजधानी सुपरफास्ट रेल्वेगाडी ६ डिसेंबरपासून पुढील सूचना मिळेपर्यंत रद्द करण्यात आली आहे. तर रेल्वेगाडी क्रमांक ०२४३७ सिकंदराबाद-निजामुद्दीन राजधानी सुपरफास्ट रेल्वेगाडी ९ डिसेंबरपासून पुढील सूचना मिळेपर्यंत रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांनी या बदलाची नोंद घेऊन आपला प्रवास निश्चित करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.