नितीन गडकरी @ ६६! शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांची उडाली झुंबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2023 08:00 IST2023-05-28T08:00:00+5:302023-05-28T08:00:16+5:30
Nagpur News केंद्रीय परिवहन, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शनिवारी त्यांच्या निवासस्थानी चाहत्यांची मोठी गर्दी उसळली होती.

नितीन गडकरी @ ६६! शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांची उडाली झुंबड
नागपूरः केंद्रीय परिवहन, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शनिवारी त्यांच्या निवासस्थानी चाहत्यांची मोठी गर्दी उसळली होती.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा वाढदिवस शनिवारी मोठ्या उत्साहात नागरिकांनी साजरा केला. सकाळपासूनच त्यांच्या निवासस्थानी त्यांना शुभेच्छा द्यायला जमलेल्या चाहत्यांची मोठी रांग होती. कुणी पुष्पमालाने, कुणी फुलांचा वर्षाव करून, कुणी केक भरवून तर कुणी त्यांना मिठाई भरवून शुभेच्छा देत होेते.
गडकरी यांच्या निवासस्थानी, त्यांच्या पत्नी कांचनताई गडकरी यांनी गडकरी यांना ओवाळून त्यांच्या दीर्घ व निरोगी आयुष्याची कामना केली. कुटुंबातील सर्व सदस्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी गडकरी यांची ६६ दिव्यांनी ओवाळणी केली.
विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.