नासुप्रच्या पथकाने अनधिकृत धार्मिक स्थळे हटविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 22:14 IST2018-12-26T22:13:35+5:302018-12-26T22:14:34+5:30
नासुप्रच्या अतिक्रमणविरोधी पथकाने बुधवारी उत्तर नागपुरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविली. एक जेसीबी, टिप्परच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली.

नासुप्रच्या पथकाने अनधिकृत धार्मिक स्थळे हटविली
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नासुप्रच्या अतिक्रमणविरोधी पथकाने बुधवारी उत्तर नागपुरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविली. एक जेसीबी, टिप्परच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. तसेच मौजा झिंगाबाई टाकळी येथील जयहिंद नगरसह गीता नगर, साईबाबा कॉलनी येथील अनधिकृत धार्मिक स्थळावर हातोडा चालविला. त्यानंतर मौजा वांजरी येथील खसरा नंबर ५१मधील रजा लॉन व एम.डी. वर्कशॉपचे अनधिकृत बांधकाम तोडले. लॉन मालक अहमद शेख यांच्याकडून ५० हजार दंड वसूल करण्यात आला. यावेळी नासुप्र उत्तरचे कार्यकारी अभियंता आर.एन. मेघराजानी, विभागीय अधिकारी सुधीर राठोड, सहायक अभियंता आर.आर.पाटील, अतिक्रमण पथक प्रमुख मनोहर पाटील व पोलीस अधिकारी उपस्थित होते.