शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

नागपुरातील एनआयटी बरखास्त, पण अवैध सेस वसुली सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2019 11:18 AM

राज्य शासनाने नागपूर सुधार प्रन्यासला (एनआयटी) २७ ऑगस्ट २०१९ ला बरखास्त केल्याची अधिसूचना जारी केली आहे. त्यानंतरही मुद्रांक शुल्काच्या स्वरुपात ०.५ टक्के अवैध सेसची वसुली करीत आहे.

ठळक मुद्देग्राहकांची दोन महिन्यांपासून लूट०.५ टक्के सेसची वसुली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य शासनाने नागपूर सुधार प्रन्यासला (एनआयटी) २७ ऑगस्ट २०१९ ला बरखास्त केल्याची अधिसूचना जारी केली आहे. त्यानंतरही एनआयटीचे अधिकारी नवीन वा जुने फ्लॅट आणि घर खरेदी करणाऱ्यांपासून मुद्रांक शुल्काच्या स्वरुपात ०.५ टक्के अवैध सेसची वसुली करीत आहे.या संदर्भात क्रेडाई नागपूर मेट्रोच्या पदाधिकाऱ्यांनी नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक नागपूर विभागाला ३० सप्टेंबरला पत्र दिले असून विभागाने हे पत्र पुणे येथील नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक कार्यालयाला पाठविले आहे. नागपूर कार्यालयाने पाठविलेल्या पत्रावर पुणे कार्यालयाने अजूनही कारवाई केलेली नाही. अधिकारी केवळ पत्रव्यवहारात दंग आहेत तर दुसरीकडे एनआयटीची वसुली सुरुच आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.क्रेडाई नागपूर मेट्रोचे सचिव गौरव अगरवाला यांनी सांगितले की, राज्य सरकारने विकासाच्या दृष्टिकोनातून घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांकडून मुद्रांक शुल्काच्या नावावर ०.५ टक्के सेस वसुलीचे अधिकार एनआयटीला दिले होते. यातून एनआयटीला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळत होता. पण एनआयटी बरखास्त झाल्यानंतर दोन महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही एनआयटी सेसची वसुली करीत आहे. ही रक्कम सर्व रजिस्ट्रार कार्यालयातून एनआयटीकडे जात आहे.

ग्राहकांकडूनच वसुलीया संदर्भात क्रेडाई नागपूर मेट्रोने नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक नागपूर विभागाला पत्र पाठवून त्याचा पाठपुरावा केला आहे. वसुलीमुळे बिल्डर्सपेक्षा ग्राहकच जास्त त्रस्त आहेत. ही वसुली ग्राहकांकडूनच करण्यात येत आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास ग्राहकांना ४० लाखांच्या फ्लॅटवर २० हजार रुपये सेस अनावश्यक भरावा लागत आहे.

एनआयटीने ग्राहकांना सेस परत करावादोन महिन्यात ग्राहकांनी ०.५ टक्क्यांच्या स्वरुपात एनआयटीला किती सेस दिला, याची तंतोतंत आकडेवारी नाही. पण वसूल केलेला सेस एनआयटीने ग्राहकांना परत करावा, अशी ग्राहकांची मागणी आहे. वसूल केलेला सेस एनआयटी आता कुठल्या विकास कामांवर खर्च करणार, यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. नागपुरात ग्राहकांना घर खरेदी करताना मुद्रांक शुल्कावर ७.५ टक्के विविध प्रकारच्या करांची वसुली करण्यात येते. अधिकाऱ्यांच्या लेटलतिफीमुळे ग्राहकांवर ०.५ टक्क्यांच्या सेसचा भार अजूनही आहे. एनआयटीने ही वसुली स्वत:हूनच बंद करावी, असे क्रेडाईच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Nagpur Improvement Trustनागपूर सुधार प्रन्यास