शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

‘नीरी’ने दिली, ‘मनपा’ने डुबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 00:54 IST

शहरातील तलावांवर तरंगणाऱ्या कचऱ्याची अगदी सहजपणे सफाई व्हावी, या हेतूने ‘सीएसआयआर-नीरी’तर्फे पुढाकार घेण्यात आला. ‘नीरी’च्या संशोधकांनी कल्पनाशक्ती व मेहनतीने अवघ्या काही कालावधीत ‘पर्यावरण प्रेरणा विदर्भ’ यांच्या सहकार्याने यासाठी ‘फ्लोटिंग सायकल’ तयार करण्यात आली. ‘नीरी’कडून ‘मनपा’ला ही ‘सायकल’ सोपविण्यात आल्यानंतर प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेण्यात आली नाही. चक्क काही अल्पवयीन मुलांनी सायकलवर सैर करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यासह ‘सायकल’ उलटली. या घटनेत कुणीही जखमी झाले नसले तरी मनपा प्रशासनाची उदासीनता मात्र दिसून आली आहे.

ठळक मुद्दे‘फ्लोटिंग सायकल’बाबत अशीही उदासीनताकधी बदलणार प्रशासनाची मानसिकता?-तर होऊ शकला असता मोठा अपघात

 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील तलावांवर तरंगणाऱ्या कचऱ्याची अगदी सहजपणे सफाई व्हावी, या हेतूने ‘सीएसआयआर-नीरी’तर्फे पुढाकार घेण्यात आला. ‘नीरी’च्या संशोधकांनी कल्पनाशक्ती व मेहनतीने अवघ्या काही कालावधीत ‘पर्यावरण प्रेरणा विदर्भ’ यांच्या सहकार्याने यासाठी ‘फ्लोटिंग सायकल’ तयार करण्यात आली. ‘नीरी’कडून ‘मनपा’ला ही ‘सायकल’ सोपविण्यात आल्यानंतर प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेण्यात आली नाही. चक्क काही अल्पवयीन मुलांनी सायकलवर सैर करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यासह ‘सायकल’ उलटली. या घटनेत कुणीही जखमी झाले नसले तरी मनपा प्रशासनाची उदासीनता मात्र दिसून आली आहे.तलावांवर तरंगणारा कचरा व विविध वस्तूंचे अवशेष ही पर्यावरण संवर्धनासाठी डोकेदुखीच बनली आहे. हा कचरा काढायला अनेकदा द्राविडीप्राणायमदेखील करावा लागतो. हीच बाब लक्षात घेऊन ‘नीरी’ने पर्यावरण प्रेरणा विदर्भ यांच्या सहकार्याने ‘फ्लोटिंग सायकल’ची निर्मिती केली आहे. ‘इकोफ्रेंडली’ असलेल्या या ‘सायकल’मुळे एकाच वेळी तलावाची सैर व स्वच्छता शक्य होऊ शकणार आहे. या ‘प्रोपेलर’मुळे तलावांमध्ये वायुमिश्रणदेखील होते व यामुळे पाण्यामधील प्राणवायूचे प्रमाण वाढायला मदत होते. या प्रक्रियेमुळे तलावाच्या पाण्यात स्व-शुद्धीकरणाची प्रक्रिया होते. या ‘फ्लोटिंग सायकल’मध्ये सुरक्षेचीदेखील तजवीज करण्यात आली असून ‘पीव्हीसी पाईप्स’चा उपयोग करण्यात आला आहे. कचरा गोळा करण्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.फुटाळा तलावाच्या स्वच्छतेसाठी ‘नीरी’तर्फे ही सायकल मनपाला सोपविण्यात आली.‘नीरी’चे संचालक डॉ. राकेश कुमार यांनी मनपाचे आयुक्त अश्विन मुद्गल यांना सकाळी ९.३० च्या सुमारास ही ‘फ्लोटिंग सायकल’ सोपविली. यावेळी मनपाचे इतर अधिकारीदेखील उपस्थित होते. ही ‘सायकल’ पाहण्यासाठी नागरिकांचीदेखील मोठी गर्दी झाली होती. कार्यक्रम झाल्यानंतर मनपातर्फे ‘सायकल’ची सुरक्षा अपेक्षित होती. प्रत्यक्षात ‘फ्लोटिंग सायकल’वर जास्तीत जास्त दोन जण उभे राहू शकतात. मात्र एकाच वेळी चार ते पाच अल्पवयीन मुलांनी ‘सायकल’वर चढण्याचा प्रयत्न केला. यात ‘सायकल’सह मुले पाण्यात पडली. यातील एका मुलाने ‘लाईफ जॅकेट’ घातले होते. या घटनेत कुणीही जखमी झाले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. परंतु संशोधकांनी मेहनतीने तयार केलेल्या गोष्टीबाबत मनपा प्रशासन किती गंभीर आहे, असा प्रश्न नक्कीच उपस्थित झाला....तर काय झाले असते ?‘फ्लोटिंग सायकल’ची क्षमता ही एक किंवा जास्तीत जास्त दोन व्यक्तींची आहे. प्रत्येकाला ‘लाईफ जॅकेट’ घालणे अनिवार्य आहे, अशी सूचनादेखील ‘नीरी’च्या संशोधकांनी केली होती. मात्र मनपाने ही सूचनाच गंभीरतेने घेतली नाही. जर ही ‘सायकल’ किनाºयापासून दूर उलटली असती तर मोठा अपघात होण्याची शक्यता होती. ‘नीरी’च्या संचालक संशोधन सेलच्या प्रमुख डॉ.आत्या कपले यांना संपर्क केला असता, आमच्यासमोर अशी घटना घडली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परंतु आम्ही निघून गेल्यावर काही ‘टीनएजर्स’ एकत्र ‘सायकल’वर चढले. साहजिकच ‘सायकल’ उलटली. यासंदर्भात मनपाचे अधिकारीच जास्त सांगू शकतील, असे त्यांनी सांगितले. मनपाचे आयुक्त अश्विन मुद्गल यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.‘इकोफ्रेंडली’ आहे ‘फ्लोटिंग सायकल’तलावांची सहजपणे स्वच्छता व्हावी या उद्देशातून ‘फ्लोटिंग सायकल’चे ‘डिझाईन’ तयार करण्यात आले आहे. या ‘सायकल’मध्ये ‘प्रोपेलर’देखील असून ‘हॅन्डल’ने दिशा देता येणे शक्य आहे.या ‘सायकल’मध्ये कुठेही इंधनाचा वापर होत नसल्यामुळे तलावाचे प्रदूषण होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे ‘नीरी’तील संशोधकांनी सांगितले आहे.

 

टॅग्स :Waterपाणीnagpurनागपूर