शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’ बालचित्रकला स्पर्धेत निर्भय, रेणुका व आईशी पुरस्काराचे मानकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 7:05 PM

‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’च्या निमित्ताने आयोजित बालचित्रकला स्पर्धेचा प्रथम पुरस्कार स्कूल आॅफ स्कॉलर्सच्या सातव्या वर्गाचा विद्यार्थी निर्भय कुंभारे याने प्राप्त केला. दुसऱ्या  क्रमांकाचा पुरस्कार श्रीनिकेतन माध्यमिक विद्यालयाची आठव्या वर्गाची विद्यार्थिनी रेणुका ओगानिया हिने तर तृतीय पुरस्कार भवन्स विद्या मंदिरच्या सातव्या वर्गाची विद्यार्थिनी आईशी डे हिने मिळविला.

ठळक मुद्दे‘माझे शहर’ व ‘सहल’ स्पर्धेचे विषय

ऑनलाईन लोकमत नागपूर : ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’च्या निमित्ताने आयोजित बालचित्रकला स्पर्धेचा प्रथम पुरस्कार स्कूल आॅफ स्कॉलर्सच्या सातव्या वर्गाचा विद्यार्थी निर्भय कुंभारे याने प्राप्त केला. दुसऱ्या  क्रमांकाचा पुरस्कार श्रीनिकेतन माध्यमिक विद्यालयाची आठव्या वर्गाची विद्यार्थिनी रेणुका ओगानिया हिने तर तृतीय पुरस्कार भवन्स विद्या मंदिरच्या सातव्या वर्गाची विद्यार्थिनी आईशी डे हिने मिळविला.‘लोकमत’ प्रस्तुत ‘सर जे.जे.स्कूल आॅफ आर्ट मुंबई’ व शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालयाच्या सहकार्याने आयोजित ही बालचित्रकला स्पर्धा पाचवी ते आठवी वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती. स्पर्धकांना ‘माझे शहर’ व ‘सहल’ हे दोन विषय देण्यात आले होते. अनेकांनी ‘माझे शहर’ हाच विषय हाताळला. यात मेडिकल चौकापासून ते संविधान चौक, सीताबर्डीतील गर्दी, उड्डाण पूल, अंबाझरी गार्डन एवढेच नव्हे तर काहींनी नागपूरचे रेल्वे स्टेशन, बसस्थानकापासून ते मेट्रो रेल्वेसाठी उभे केलेले पिलर्सही आपल्या कुंचल्यातून साकारले. ‘सहल’ या विषयाला घेऊन साकारण्यात आलेल्या चित्रात अनेक चिमुकल्यांनी महाराजबागेसह इतर उद्यानातील चित्र रेखाटले. या स्पर्धेच्यानिमित्ताने स्वत:ला व्यक्त करण्याची आणि कल्पकता दाखविण्याची सुवर्णसंधीच विद्यार्थ्यांना मिळाली होती. स्पर्धेचे परीक्षण प्रा. शशिकांत ढोकणे, प्रा. श्रीकांत गडकरी व प्रा. बाबर शरीफ यांनी केले.स्पर्धेचे बक्षीस वितरण सोमवारी सिव्हिल लाईन्स येथील वसंतराव देशपांडे सभागृहात पार पडले. यावेळी सर जे.जे. स्कूल आॅफ आर्ट मुंबईचे प्रा. शशिकांत काकडे, प्रा. विजय बोंधर, प्रा. यशवंत भाऊसार, प्रा. नितीन पाटील, शासकीय चित्रकला महाविद्यालय नागपूरचे प्रा. संजय जठार, प्रा. किशोर इंगळे, प्रा. पंकज इटकेलवार आदी उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. संचालन नेहा जोशी यांनी केले.विजेत्यांची नावेप्रथम पुरस्कार (पाच हजार रुपये) निर्भय कुंभारे (स्कूल आॅफ स्कॉलर्स), द्वितीय पुरस्कार (तीन हजार रुपये) रेणुका ओगानिया (श्रीनिकेतन माध्यमिक विद्यालय), तृतीय पुरस्कार (दोन हजार रुपये) आईशी डे (भवन्स विद्या मंदिर) ,प्रोत्साहन पुरस्कार (एक हजार रुपये) अथर्व जाधव (न्यू इंग्लिश हायस्कूल), साहिल सहारे (मंदिर पब्लिक स्कूल), रूपेश ठवकर (दुर्गा नगर हायस्कूल), मानसी अग्रवाल (भवन्स विद्या मंदिर सिव्हिल लाईन्स), गिरीश थमोभ (एसएफएस हायस्कूल), मानसी गुप्ता (दुर्गानगर हायस्कूल), ईशा सोमकुवर (जिंदल विद्या मंदिर) व रुद्रांश त्रिपाठी (जिंदल विद्यामंदिर).

 

टॅग्स :world orange festival Nagpurवर्ल्ड ऑरेंज फेस्टीवल नागपूरnagpurनागपूर