बोखारा परिसरात नऊ गाड्यांची तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:10 IST2021-02-16T04:10:56+5:302021-02-16T04:10:56+5:30
कोराडी : मॉडेल स्कूल, बोखारा परिसरात चारचाकी वाहनांचे काच फोडणाऱ्या टोळीने हैदोस घातला आहे. या घटनेने येथील नागरिक त्रस्त ...

बोखारा परिसरात नऊ गाड्यांची तोडफोड
कोराडी : मॉडेल स्कूल, बोखारा परिसरात चारचाकी वाहनांचे काच फोडणाऱ्या टोळीने हैदोस घातला आहे. या घटनेने येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. रविवारी रात्री काही समाजकंटकांनी या परिसरातील नऊ गाड्यांच्या काचा फोडल्या. घरासमोर पार्क करून ठेवलेल्या चारचाकी वाहनांच्या काचावर या टोळीने दगडाने हल्ला केला. काही गाड्यांची बाहेरून तोडफोड करण्यात आली. विद्यानगर, बजरंगनगर, राजलक्ष्मी ले-आऊट आदी भागात या टोळीने उच्छाद घातला आहे. सर्व संबंधितांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली आहे. शिवा हनुमान मंदिर माॅडर्न स्कूलजवळील दिलीप चक्रवर्ती, राजेंद्र पोटकुले, सुमित माटे, राजलक्ष्मी हाऊसिंग सोसायटीमधील नरेशसिंग पटले, ज्ञानेश्वर लोहकरे, धनराज गायकवाड यांच्या गाड्यांसह एकूण नऊ गाड्यांची तोडफोड या टोळीने केली आहे. या घटनेची तक्रार कोराडी पोलिसात केली असून, पोलिसांचे शोध पथक पुढील तपास करीत आहे.