शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात व्यावसायिकाची नऊ लाखांची रोकड लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 21:23 IST

खरडा व्यावसायिकाची नऊ लाखांची रोकड असलेली बॅग अज्ञात चोरट्याने कारमधून पळवून नेली. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एचडीएफसी बँकेच्याजवळ बुधवारी भरदुपारी ही घटना घडली.

ठळक मुद्देएचडीएफसी बँकेजवळ घडली घटना : अंबाझरीत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खरडा व्यावसायिकाची नऊ लाखांची रोकड असलेली बॅग अज्ञात चोरट्याने कारमधून पळवून नेली. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एचडीएफसी बँकेच्याजवळ बुधवारी भरदुपारी ही घटना घडली. मनीष तरसेमकुमार बंसल (वय ४२) असे तक्रारदार व्यावसायिकाचे नाव आहे.बंसल रचना साईतारा, गिट्टीखदानमध्ये राहतात. त्यांची खरडा (कार्टून) बनविण्याची कंपनी आहे. कंपनीत काम करणाऱ्यांचे पगार आणि दिवाळी बोनस देण्यासाठी म्हणून त्यांनी बुधवारी दुपारी ३. ४० च्या सुमारास एचडीएफडी बँकेतून नऊ लाखांची रोकड काढली. ही रक्कम त्यांनी एका बॅगमध्ये भरून ती बॅग आपल्या कारच्या ड्रायव्हिंग सिटच्या बाजूच्या सीटवर ठेवली. त्यानंतर ते आपला लॅपटॉप दुरुस्त करण्यासाठी शंकरनगर चौकाजवळच्या एका इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात गेले. तेथे त्यांच्या कंपनीच्या भागीदाराचा फोन आला. बँकेतून सही मिस मॅच झाल्याचा फोन आला आणि बँक अधिकाऱ्याने तातडीने तुम्हाला बँकेत बोलविले, असा निरोप रितेश जैन नामक भागीदाराने दिल्यामुळे बंसल पुन्हा बँकेत पोहचले. त्यांनी आपली कार बँकेच्या बाजूला लावली आणि रोकड असलेली बॅग घाईगडबडीत कारमध्येच ठेवून ते आत गेले. काही वेळेनंतर ते परत आले तेव्हा त्यांना कार (एमएच ३१/ ईयू ३७२०) मध्ये ठेवलेली बॅग आढळली नाही. चोरट्याने कारच्या दाराची कांच तोडून बॅग लंपास केली होती. बंसल यांनी लगेच आपल्या भागीदाराला फोन करून बँकेत बोलवून घेतले. त्यानंतर अंबाझरी ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. रोकड चोरणाऱ्याचा पोलीस शोध घेत आहेत.सीसीटीव्ही फुटेजचा आधारया धाडसी चोरीचा शोध लावण्यासाठी पोलिसांना सीसीटीव्हीचा एकमात्र आधार आहे. त्या आधारे पोलीस चोरट्यापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, चोरटा बंसल यांनी बँकेतून रोकड काढल्यापासून त्यांच्या मागावर असावा, असा पोलिसांचा संशय आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरी