जुगार खेळणाऱ्या नऊ जणांना अटक
By Admin | Updated: October 22, 2015 04:22 IST2015-10-22T04:22:25+5:302015-10-22T04:22:25+5:30
हुडकेश्वर परिसरातील दुबेनगर भागात पवन विष्णुप्रसाद राय यांच्या घरी जुगार खेळणाऱ्या नऊ आरोपींना गुन्हे शाखेने

जुगार खेळणाऱ्या नऊ जणांना अटक
नागपूर : हुडकेश्वर परिसरातील दुबेनगर भागात पवन विष्णुप्रसाद राय यांच्या घरी जुगार खेळणाऱ्या नऊ आरोपींना गुन्हे शाखेने अटक करून त्यांच्याकडून ३.२१ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. पवन विष्णुप्रसाद राय (३८) रा. दुबेनगर, पंकज सतीश कापसे (३१) रघुजीनगर, संजय गोपाळ सोनवणे (४९) जुना सुभेदार ले आऊट, मोहन जयराम ठवकर (४५) गोपाळकृष्ण ले आऊट, नरसाळा रोड, निरंजन दामोदर लिंगे (३८) चक्रधरनगर, विनोद अमृत रामटेके (३६) न्यू नंदनवन, राजेश रामचंद्र काकडे (३९) नरसाळा रोड, प्रशांत छत्रपती गभने (३३) संत तुकडोजीनगर नरसाळा रोड आणि चंदू किसन डोये (४०) सुदामनगरी सक्करदरा अशी आरोपींची नावे आहेत. ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त श्रीकांत तरवडे, पोलीस उपायुक्त रंजन कुमार शर्मा, दीपाली मासिरकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक शिवाजी गायकवाड, संजय देवकर, मिलिंद मून, गोपाल देशमुख, रामकैलास यादव यांनी पार पाडली.(प्रतिनिधी)