शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

थर्टी फस्टच्या रात्री लॉन, ढाबे महावितरणच्या रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 10:38 PM

सरत्या वर्षाला 'गुड बाय' करण्यासाठी आणि नूतन वर्षाचे भरभरून स्वागत करण्यासाठी नागपूर शहर आणि सभोवतालची हॉटेल्स, रिसॉर्ट्स, ढाबे आणि लॉन्स सज्ज झाले आहेत. अनेक ठिकाणी मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. या कार्यक्रमात विजेचा अनधिकृत वापर होऊ नये यासाठी महावितरणने विशेष उपाययोजना केल्या असून हा आनंद साजरा करताना विजेचा अधिकृत वापर करण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

ठळक मुद्देवीजचोरी प्रकरणी गुन्हा दाखल करणारआयोजकांचा परवाना रद्द करणार

आॅनलाईन लोकमतनागपूर : सरत्या वर्षाला 'गुड बाय' करण्यासाठी आणि नूतन वर्षाचे भरभरून स्वागत करण्यासाठी नागपूर शहर आणि सभोवतालची हॉटेल्स, रिसॉर्ट्स, ढाबे आणि लॉन्स सज्ज झाले आहेत. अनेक ठिकाणी मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. या कार्यक्रमात विजेचा अनधिकृत वापर होऊ नये यासाठी महावितरणने विशेष उपाययोजना केल्या असून हा आनंद साजरा करताना विजेचा अधिकृत वापर करण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.नागपूर शहर आणि लगतच्या परिसरात अनेक लॉन, हॉटेल्स, रिसॉर्टस आणि ढाब्यांवर मनोरंजनासोबतच गायन, नृत्य, डीजे, बॉलिवूड नाईट, डिस्को, जॉझ, पॉप, इंटरनॅशनल साँग्स, पार्टीज, लाईव्ह बॅण्ड यासारख्या अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. अशा कार्यक्रमांप्रसंगी अनेक ठिकाणी चोरीची वीज वापरली जात असल्याची माहिती असून त्यावर निर्बंध घालण्यासाठी महावितरणने अनेक उपाययोजना केल्या आहेत. अशा कार्यक्रमाप्रसंगी वीजचोरी आढळल्यास वीजचोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासोबतच संबंधित आयोजकाचा परवाना रद्द्बातल करण्यासाठी शासकीय यंत्रणेकडे पाठपुरावाही केला जाणार असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.शहराबाहेरील अनेक ढाबाचालक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी महामार्ग व रस्त्यांवर चोरीच्या विजेवर आकर्षक रोषणाई करीत असल्याचीही माहिती असून मंडप डेकोरेशन व्यावसायिकांकडून वीज तारांवर आकडे टाकून देण्याची व्यवस्था केली जात असल्याचीही माहिती आहे. अशा ढाबा आणि मंडप डेकोरेशन व्यावसायिकांवर कठोर कारवाईसोबतच त्यांचाही व्यावसायिक परवाना रद्द करण्यासाठी संबंधित यंत्रणेकडे पाठपुरावा करण्याबाबत महावितरणची आग्रही भूमिका राहील.३१ डिसेंबर हा उत्सवाचा सण असून या दिवशी उत्सवप्रेमींच्या आनंदात विघ्न पडू नये यासाठी अधिकृत विजेचाच वापर करण्यात येऊन आनंद व्दिगुणित करण्याचे आवाहनही महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणnagpurनागपूर