विमानतळावर नायजेरियन प्रवाशाला अटक
By Admin | Updated: January 29, 2016 05:18 IST2016-01-29T05:18:21+5:302016-01-29T05:18:21+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी सकाळी एका नायजेरियन प्रवाशाला अटक केली. त्याच्याकडून

विमानतळावर नायजेरियन प्रवाशाला अटक
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी सकाळी एका नायजेरियन प्रवाशाला अटक केली. त्याच्याकडून बोगस व्हिसा जप्त केला. उजोर उबोबुबो असे प्रवाशाचे नाव असून तो ३० वर्षांचा आहे.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलच्या (सीआयएसएफ) जवानांनी त्याला बाहेर निघण्याच्या गेटजवळून ताब्यात घेतले. चौकशीनंतर त्याला इमिग्रेशन विभागाच्या हवाली केले. या विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला सोनेगांव पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्याजवळ असलेल्या व्हिसाची मुदत संपली आहे. तो सकाळी ७.१० वाजता दिल्ली-नागपूर विमानाने नागपुरात पोहोचला. एक तास थांबल्यानंतर तो परत जाण्यासाठी विमानतळावर आला होता. तो विमानतळावर एक तास का थांबला, कुणाला भेटण्यासाठी आला होता आणि कोणत्या विमानाने तो परत जाणार होता, या संदर्भात विस्तृत माहिती मिळू शकली नाही.