वृत्तपत्र विक्रेत्यांनी लसीकरण करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:08 IST2021-04-07T04:08:16+5:302021-04-07T04:08:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महाराष्ट्रात ‘कोरोना’च्या प्रसारामुळे राज्य शासनाने अनेक नवे निर्बंध जाहीर केले आहेत. वृत्तपत्र व्यवसायातील संबंधित ...

वृत्तपत्र विक्रेत्यांनी लसीकरण करावे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्रात ‘कोरोना’च्या प्रसारामुळे राज्य शासनाने अनेक नवे निर्बंध जाहीर केले आहेत. वृत्तपत्र व्यवसायातील संबंधित सर्वच एजंट्स आणि वृत्तपत्र विक्रेत्यांना वृत्तपत्र वाटप करण्याची मुभा देण्यात आली. ४५ वर्षांवरील सर्व एजंट्स व विक्रेत्यांनी ताबडतोब लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन ‘व्हीडीएनए’चे अध्यक्ष श्रीकृष्ण चांडक यांनी केले आहे.
‘कोरोना’चा धोका वाढतो आहे. त्यामुळे वृत्तपत्र व्यवसायातील संबंधित सर्वच एजंट्स आणि वृत्तपत्र विक्रेत्यांनी काळजी घ्यावी व हयगय करू नये. सरकारी सूचनांची अंमलबजावणी करून ‘कोरोना’चा अधिक प्रसार अधिक होणार नाही यावर भर दिला पाहिजे. ४५ वर्षांखालील वृत्तपत्र विक्रेत्यांनी घराजवळील केंद्रावर ‘कोरोना’ची ‘आरटीपीसीआर’ चाचणी करून घ्यावी व ते प्रमाणपत्र स्वत:जवळ बाळगावे, असेदेखील श्रीकृष्ण चांडक यांनी सांगितले.