नवजात शिशूला निर्जन ठिकाणी फेकले
By Admin | Updated: March 23, 2015 02:12 IST2015-03-23T02:12:33+5:302015-03-23T02:12:33+5:30
नवजात शिशूला निर्जन ठिकाणी फेकून तिच्या जन्मदात्रीने पळ काढला.

नवजात शिशूला निर्जन ठिकाणी फेकले
नागपूर : नवजात शिशूला निर्जन ठिकाणी फेकून तिच्या जन्मदात्रीने पळ काढला. अवघ्या सात दिवसाच्या या चिमुकलीचा आक्रोश ऐकून एका सद्गृहस्थाने तिला मेडिकलमध्ये दाखल केले. शुक्रवारी रात्री ही घटना उघडकीस आली. मेडिकलचे अधिष्ठाता यांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या मार्गावर एका चिमुकलीचा आक्रोश सुरू होता. रस्त्याने जाणाऱ्याने आवाजाच्या दिशेने जाऊन बघितले तेव्हा त्यांना झुडुपात एक नवजात शिशू बेवारस अवस्थेत आढळला. ‘तिला’ उचलून मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरू असून, या प्रकाराची माहिती अजनी पोलिसांना कळविण्यात आली. (प्रतिनिधी)