शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

कोराडीत नवे दोन वीज संच : मंत्रिमंडळाची मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 22:11 IST

दररोज वाढणारी विजेची मागणी लक्षात घेता महानिर्मिती कंपनीने कोराडी येथे कोळशाच्या सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित वीज निर्मिती करणारे प्रत्येकी ६६० मेगावॉट क्षमतेचे दोन संच उभारण्याचा निर्णय घेतला असून राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी या प्रस्तावाला तत्त्वत: मान्यता दिली.

ठळक मुद्देसुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दररोज वाढणारी विजेची मागणी लक्षात घेता महानिर्मिती कंपनीने कोराडी येथे कोळशाच्या सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित वीज निर्मिती करणारे प्रत्येकी ६६० मेगावॉट क्षमतेचे दोन संच उभारण्याचा निर्णय घेतला असून राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी या प्रस्तावाला तत्त्वत: मान्यता दिली.वीज नियामक आयोगाकडून या प्रस्तावाला मान्यता प्राप्त झाल्यानंतर शासनाकडून २० टक्के भागभांडवल मिळण्यासाठ़ी प्रस्ताव सादर करण्यासही मान्यता देण्यात आली. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंबंधीचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता. वेगाने होणारे औद्योगिकीकरण आणि पायाभूत सुविधांच्या विकासामुळे राज्यातील विजेच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यंदा विजेची सर्वाधिक मागणी २५ हजार मेगावॉटपर्यंत नोंदविली गेली आहे. तसेच १९ व्या ऊर्जा सर्वेक्षणानुसार अनुमानित केलेली विजेची मागणी २०३६३ मेगावॉट आहे. त्यापेक्षाही अधिक मागणीची नोंद यंदा झाली आहे.महावितरणच्या पुनरावलोकनानुसार सन २०२३-२४ मध्ये २७०० पेक्षा अधिक मागणी होण्याची शक्यता आहे. सन २०१२३-२४ साठ़ीचा २५ हजार मेगावॉट वीजपुरवठा लक्षात घेता २०१९ मेगावॅट विजेची तूट भासू शकते. महानिर्मितीची सध्याची एकूण निर्मिती क्षमता १३६०२ मेगावॉट असून त्यापैकी १०१७० मेगावॉट वीज कोळशावर आधारित आहे. कोळशावर आधारित क्षमतेपैकी महानिर्मितीचे १६८० मेगावॉट क्षमतेचे जुने संच बंद करावे लागणार आहेत.ही वस्तुस्थिती लक्षात घेता २ बाय ६६० मेगावॉट नवीन संचाची आवश्यकता असल्याचे दिसून येते. सध्या संच क्रमांक १ ते ४ बंद आहेत. या संचांच्या इमारती व संरचना हटवून ती जागा नवीन संचासाठी उपयोगात आणता येणार आहे. त्यामुळे नवीन संचांसाठी भूसंपादनाची आवश्यकता भासणार नाही. प्रस्तावित संचांसाठी महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून पाणी उपलब्ध होऊ शकणार आहे. या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज कोराडी वीज केंद्र येथे सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या स्वीच यार्डमध्ये आवश्यक ते बदल करून त्याद्वारे निर्गमित होऊ शकते.या प्रकल्पात संच क्रमांक १ काम पूर्ण होण्यासाठी ४५ महिने व संच क्रमांक २ पूर्ण होण्यासाठी ५१ महिने लागण्याची शक्यता आहे. या प्रकल्पासाठी ८० टक्के रकक्म कर्ज रूपाने तर २० टक्के भागभांडवलातून उभारण्यात येणार असे प्रस्तावात म्हटले आहे.संच क्रमांक ६ चे नूतनीकरण जागतिक बँकेच्या वित्त पुरवठा योजनेअंतर्गत भारत सरकारच्या कोळशावर आधारित वीज निर्मिती केंद्राच्या पुनर्वसन प्रकल्पानुसार महानिर्मितीच्या कोराडी संच क्रमांक ६ चे कार्यक्षम नूतनीकरण व आधुनिकीकरण करण्याचे ठरविले आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी ४८६ कोटी व महाराष्ट्र शासनाकडून ९६ कोटींच्या भागभांडवल उभारणीस मान्यता देण्यात आली. या संचाच्या नूतनीकरण व आधुनिकीकरण प्रकल्पाच्या सुधारित खर्चास ५६३.१२ कोटी रकमेस मान्यता देण्यात आली आहे.

 

टॅग्स :electricityवीजnagpurनागपूर