नवीन सुभेदार नागरी पतसंस्थेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:04 IST2020-11-28T04:04:34+5:302020-11-28T04:04:34+5:30
\Sनागपूर : नवीन सुभेदार नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे गेल्या काही दिवसांपासून ग्राहक व सभासदांसाठी त्वरित कर्ज उपलब्ध योजना राबवित आहे. ...

नवीन सुभेदार नागरी पतसंस्थेत
\Sनागपूर : नवीन सुभेदार नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे गेल्या काही दिवसांपासून ग्राहक व सभासदांसाठी त्वरित कर्ज उपलब्ध योजना राबवित आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या काही महिन्यांपासून अनेक लोकांची नोकरी, व्यवसाय बुडाले आहेत. अशा लोकांना आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे. संस्थेने व्यवसाय करणाऱ्यांसाठी त्वरित कर्ज योजना तसेच सोने तारणावर ८० टक्क्यांपर्यंत कर्ज दिले जात आहे. त्याचप्रमाणे २ लाखांपर्यंत वैयक्तिक कर्ज, १ कोटीपर्यंत हाऊसिंग व ओडी कर्ज संस्थेतर्फे देण्यात येते. संस्थेचे अध्यक्ष श्रीराम मांडस्कर म्हणाले, संस्थेच्या १२ शाखा असून सहा शाखा स्वत:च्या इमारतीत आहेत. २० कोटींची स्थावर मालमत्ता आहे. एकूण उलाढाल ८०० कोटी, १८० कोटींच्या ठेवी, ४६ कोटींची इतर बँकेत तरलता म्हणून गुंतवणूक आहे. सर्व व्यवहार ऑनलाईन असून एनईएफटी, आरटीजीएस, ईसीएस सुविधा आहे. सर्व शाखा नेट बँकिंगद्वारे जोडण्यात आल्या आहेत. एकूण १४ हजार सभासद आहेत. दरवर्षी लाभांशाचे वाटप केले जाते. संस्था १५ महिन्याच्या मुदत ठेवीवर ९ टक्के व ज्येष्ठ नागरिकांना ठेवीवर ९.५ टक्के व्याज देते. (वा.प्र.)