शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
2
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
3
भारत G7 परिषदेचा सदस्य नाही, तरीही PM मोदी केंद्रस्थानी! जागतिक पटलावर काय आहे अर्थ?
4
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
5
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
6
दहशतवाद्यांचे 'ऑल आउट'?; काश्मीरच्या वाढत्या दहशतवादाविषयी केंद्र सरकारची आज महत्त्वपूर्ण बैठक
7
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
8
आजचे राशीभविष्य, १६ जून २०२४ : मिथुनसाठी काळजीचा अन् वृश्चिकसाठी आनंदाचा दिवस
9
आम्ही देखील माणसं आहोत, चूक होऊ शकते; पाकिस्तानी खेळाडूची प्रामाणिक कबुली
10
T20 WC, AUS vs SCO : सुपर-८ साठी चुरस! ऑस्ट्रेलियाची बेक्कार धुलाई; इंग्लंडची धाकधुक वाढली
11
वादाची ठिणगी पडली; महायुतीत आम्हीच मोठे भाऊ असल्याचा शिंदेसेनेचा दावा 
12
मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; आज घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक बघा!
13
आई ओरडल्यानं तरूणीची नदीत उडी! प्रियकरानेही उचललं टोकाचं पाऊल; मच्छिमार बनले देवदूत
14
धक्कादायक! वायकरांच्या नातेवाइकाने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन
15
हिजाब बंदीविरोधात विद्यार्थी कोर्टात राज्य, केंद्र सरकार प्रतिवादी; १९ जूनला सुनावणी
16
अण्णा, आमच्या दादांना तुम्ही क्लीनचिट दिली की नाही..?
17
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
18
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
19
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
20
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?

रुट कॅनलमध्ये नवा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 10:27 AM

प्रसिद्ध ‘रुट कॅनल विशेषज्ञ’ व व्हीएसपीएम डेंटल कॉलेज अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरच्या दंतशल्यशास्त्र व रुट कॅनल विभागाच्या प्रमुख डॉ. प्रतिमा शेनॉय व डॉ. चेतना माकडे यांनी ‘फिलिंग’च्या निर्जंतुकीकरणावरच नवा शोध लावला आहे.

ठळक मुद्देप्रतिमा शेनॉय व चेतना माकडे यांचे संशोधन पेटेंटसाठी केला अर्ज

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : किडलेल्या दातावर ‘रुट कॅनल’ दातासाठी वरदान ठरले आहे. मात्र, या उपचार पद्धतीत वापरण्यात येणारे ‘फिलिंग’ सामान्य भाषेत सिमेंट व वैद्यकीय भाषेत ‘गुट्टा पर्चा’चे निर्जंतुकीकरण झाले नसल्याने ‘रुट कॅनल’ अयशस्वी होण्याचा धोका असतो. याबाबत सर्व दंततज्ज्ञासमोर एक मोठा प्रश्न उभा राहायचा. प्रसिद्ध ‘रुट कॅनल विशेषज्ञ’ व व्हीएसपीएम डेंटल कॉलेज अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरच्या दंतशल्यशास्त्र व रुट कॅनल विभागाच्या प्रमुख डॉ. प्रतिमा शेनॉय व डॉ. चेतना माकडे यांनी याच्या निर्जंतुकीकरणावरच नवा शोध लावला आहे. या संशोधनला पेटेंट मिळविण्यासाठी अर्जही केला आहे.विशेष म्हणजे, इंटरनॅशनल फेडरेशन आॅफ एन्डोडॉन्टिक्स असोसिएशनच्यावतीने नुकतेच कोरिया येथे ‘रुट कॅनल वर्ल्ड काँग्रेस’चे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत ६०वर देशांचे दंतरोगतज्ज्ञ व दंतशल्यचिकित्सक सहभागी झाले होते. यात डॉ. शेनॉय व डॉ. माकडे यांनी हा शोधनिबंध सादर केला.‘लोकमत’शी बोलताना डॉ. शेनॉय म्हणाल्या, पिझ्झा, बर्गर, चॉकलेट्स, बिस्कीटचे सेवन वाढल्याने व रात्री झोपताना ब्रश करण्याचे महत्त्व अद्यापही न उमगल्याने दात किडण्याचे प्रमाण वाढले आहे. पूर्वी दातांना कीड लागली तर काढण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. मात्र दंतचिकित्सेमध्ये झालेल्या संशोधनामुळे ‘रुट कॅनल’ उपचार पद्धती पुढे आली आहे. परिणामी, सुंदर मोत्यांसारख्या दातांसाठी ते एक वरदान ठरले आहे. या उपचारपद्धतीत दाताच्या किडलेल्या भागावर ‘ड्रिल’ करून तो भाग काढून टाकला जातो. त्यानंतर त्याभागाची हायड्रोजन पॅराक्साईड किंवा सोडियम हायड्रोक्लोराईडने स्वच्छता केली जाते. खोल केलेला तो भाग ‘गुट्टा पर्चा’ने भरला जातो. परंतु या ‘फिलर’ला तापवून किंवा कुठल्या रसायनमध्ये बडवून निर्जंतुकीकरण अशक्य असायचे. यामुळे अनेक समस्या निर्माण व्हायचा. साधारण १० टक्के ‘रुट कॅनल’ अयशस्वी होण्यामागे निर्जंतुकीकरण हे एक कारण समोर यायचे. परंतु यावर पर्याय नव्हता. याला घेऊनच गेल्या काही वर्षांपासून संशोधन सुरू होते.

असे आहे संशोधनडॉ. शेनॉय म्हणाल्या, वेगवेगळ्या वनस्पतीचा औषधांमध्ये वापर होतो. २०१३ मध्ये व्हीएसपीएम डेंटल कॉलेज अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरच्या परिसरात औषधी वनस्पतीचा बगिचा तयार केला. देशातील हा पहिला बगिचा असावा. दाताच्या उपचारात औषधी वनस्पतीचा उपयोग होत नाही. मात्र आम्ही त्यावर संशोधन सुरू केले. ‘गुट्टा पर्चा’च्या निर्जंतुकीकरण करण्यासाठी याचा वापर करता येईल का, याचा अभ्यास केला. यासाठी ‘लेमनग्रास’च्या तेलाचा उपयोग केला. तेलात ‘गुट्टा पर्चा’ बुडवून ठेवल्यास निर्जंतुकीकरण होत असल्याचे आढळून आले. हाच तो नवा शोध होता. या शोधामुळे या उपचारपद्धतीत १०० टक्के निर्जंतुकीकरण शक्य झाले. या संशोधनात हॉस्पिटलचा मोठा वाटा आहे, असेही डॉ. शेनॉय म्हणाल्या.

टॅग्स :Healthआरोग्य