हायकोर्टात मंगळवारपासून नवीन रोस्टर

By Admin | Updated: August 13, 2016 02:18 IST2016-08-13T02:18:50+5:302016-08-13T02:18:50+5:30

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात १६ आॅगस्टपासून नवीन रोस्टर लागू होणार आहे.

New roster from Tuesday in the High Court | हायकोर्टात मंगळवारपासून नवीन रोस्टर

हायकोर्टात मंगळवारपासून नवीन रोस्टर

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात १६ आॅगस्टपासून नवीन रोस्टर लागू होणार आहे. यासंदर्भात शुक्रवारी आदेश जारी करण्यात आला. नवीन रोस्टरनुसार, युगुलपीठामधून न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांच्याकडे जनहित याचिका, १९९६ पर्यंतच्या दिवाणी रिट याचिका, १९९८, २०००, २००२, २००४, २००६, २००८, २०१०, २०१२, २०१४ व २०१६ मधील दिवाणी रिट याचिका, सर्व लेटर पेटेन्ट अपील्स, न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व अतुल चांदूरकर यांच्याकडे फौजदारी प्रकरणे, तर न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व इंदिरा जैन यांच्याकडे १९९७, १९९९, २००१, २००३, २००५, २००७, २००९, २०११, २०१३ व २०१५ मधील दिवाणी रिट याचिका व सर्व प्रथम अपील्सची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
एकलपीठामधून न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांच्याकडे विषम वर्षातील सर्व दिवाणी रिट याचिका, न्यायमूर्ती रवी देशपांडे यांच्याकडे सम वर्षांतील दिवाणी रिट याचिका, सर्व द्वितीय अपील्स, न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्याकडे फौजदारी प्रकरणे, तर न्यायमूर्ती झेड. ए. हक यांच्याकडे प्रथम अपील्स, अपील्स फ्रॉम आॅर्डर्स, दिवाणी पुनर्विचार अर्ज व किरकोळ अर्जांची जबाबदारी राहणार आहे. अंतिम सुनावणीसाठी दाखल प्रकरणे ऐकण्यासाठी गुरुवार दिवस कायम ठेवण्यात आला आहे.(प्रतिनिधी)

Web Title: New roster from Tuesday in the High Court