शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
2
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
3
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
4
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
5
लाईव्ह कॉन्सर्टमध्येच नखं कापायला लागला अरिजीत सिंग, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; Video व्हायरल
6
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
7
तिरुपती बालाजी मंदिरात लग्न करणार जान्हवी कपूर? दोनच शब्दात कमेंट करत म्हणाली...
8
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
9
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
10
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
11
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
12
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
13
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव
15
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
16
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
17
‘मित्रांनो, क्षमा करा; मुंबईत आता आणखी लोकांचे स्वागत नाही’
18
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
19
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
20
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ

प्रदेश काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर नव्या जबाबदाऱ्या; नाना पटोले यांनी केले वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2021 9:20 PM

Nagpur News महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी नवनियुक्त प्रदेश पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्यांचे वाटप केले असून अतुल लोंढे यांच्याकडे मुख्य प्रवक्तेपदाची, तर विशाल मुत्तेमवार यांच्यावर सोशल मीडिया राज्य प्रभारीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

ठळक मुद्देअतुल लोंढे मुख्य प्रवक्ते, सोशल मीडिया प्रभारीपदी विशाल मुत्तेमवारडॉ. सुनिल देशमुख यांच्याकडे आघाडी संघटना, विभाग व सेलची जबाबदारी

नागपूर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी नवनियुक्त प्रदेश पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्यांचे वाटप केले असून अतुल लोंढे यांच्याकडे मुख्य प्रवक्तेपदाची, तर विशाल मुत्तेमवार यांच्यावर सोशल मीडिया राज्य प्रभारीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. (New responsibilities on Pradesh Congress office bearers; Distributed by Nana Patole)

आघाडी संघटना, विभाग व सेल या विभागाच्या प्रमुखपदी माजी मंत्री व प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुनिल देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली असून सहप्रमुख म्हणून सरचिटणीस आ. अभिजित वंजारी जबाबदारी सांभाळतील.

प्रदेश काँग्रेसच्या कामात सुसूत्रता व वेग यावा यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विविध समित्यांची रचना करून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना जबाबदारीचे वाटप केले आहे. लोंढे यांनी गेली दोन वर्षे प्रसारमाध्यमांसमोर पक्षाचा किल्ला लढविला. याचे बक्षीस त्यांना मिळाले आहे, तर, सोशल मीडियाच्या माध्यमातून काँग्रेसची ध्येय-धोरणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासोबतच विरोधी पक्षांकडून होणाऱ्या विखारी प्रचारालाही उत्तर देण्याची जबाबदारी आता विशाल मुत्तेमवार यांच्यावर आली आहे. विशाल हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव असून अखिल भारतीय काँग्रेस समितीचे मीडिया पॅनलिस्ट व चंद्रपूर शहर आणि जिल्ह्याचे प्रभारी म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.

टॅग्स :congressकाँग्रेस