लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरच्या संत्र्याला जागतिक व्यासपीठ मिळवून देताना संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना नवीन विकसित तंत्रज्ञानाची माहिती, संत्रा या फळाला बाजारपेठेसोबत प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी लोकमतच्या पुढाकाराने जागतिक संत्रा महोत्सवाचे आयोजन येत्या १८ ते २१ जानेवारीदरम्यान सुरेश भट सभागृहात करण्यात येणार असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील तंत्रज्ञानाची माहिती या महोत्सवाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.या महोत्सवानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन होत असल्यामुळे याचा लाभ संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. या महोत्सवात विविध देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहून तेथील संत्रा उत्पादनासंदर्भातील तंत्रज्ञानाची माहिती राज्यातील शेतकऱ्यांना या महोत्सवाच्या माध्यमातून होणार आहे. तसेच देशाच्या विविध भागातील संत्रा उत्पादक संस्था व प्रक्रिया उद्योगाचे प्रतिनिधीसुद्धा या महोत्सवात निमंत्रित करण्यात आले आहेत. संत्र्याचे ब्रॅण्डिंग आणि प्रमोशन करणे हा या महोत्सवाचा उद्देश आहे.लोकमतच्या पुढाकाराने गेल्यावर्षी संत्रा महोत्सवाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. त्याच धर्तीवर यावर्षी सुद्धा आयोजन करण्यात येणार असून याच्या माध्यमातून पर्यटकांना आकर्षित करणे. तसेच संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादनासोबतच विक्री व्यवस्थापनाची माहिती देण्यात येईल. यासाठी आवश्यक तांत्रिक ज्ञान देण्यासाठी शेतकऱ्यांना निमंत्रित करण्यात येणार आहे.पालकमंत्र्यांनी दिल्या सूचनाजागतिक संत्रा महोत्सव आयोजनासंदर्भात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागृहात विविध संस्था, संत्रा उत्पादक तसेच वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत महापौर नंदा जिचकार, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, महापालिकेचे अपर आयुक्त रवींद्र ठाकरे, उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे, महाआॅरेंजचे श्रीधर ठाकरे, लोकमत समूहाचे निलेश सिंह आदी उपस्थित होते. अनिरुद्ध हजारे यांनी सादरीकरणाद्वारे महोत्सवाच्या विविध उपक्रमाविषयी माहिती दिली. संत्रा महोत्सव आयोजनासाठी सर्व विभागांचा समन्वय राहावा यासाठी जिल्हास्तरावर नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी व आयोजनासाठी महापालिकेसह सर्व विभागांनी सहकार्य करावे,अशा सूचना यावेळी पालकमंत्र्यांनी दिल्या.कृषी विभागाने घेतली बैठक, शेतकरीही उत्सुक