नवे सरकार - नवा ‘लूक’
By Admin | Updated: November 25, 2014 00:50 IST2014-11-25T00:50:39+5:302014-11-25T00:50:39+5:30
दरवर्षी डिसेंबर महिन्यात नागपुरात हिवाळी अधिवेशन होत असले तरी यावेळी त्याला वेगळे महत्त्व आहे. गेले दीड दशक विरोधी पक्षाचे आमदार म्हणून अधिवेशनात हजर राहणारे नागपूरकर देवेंद्र फडणवीस

नवे सरकार - नवा ‘लूक’
दरवर्षी डिसेंबर महिन्यात नागपुरात हिवाळी अधिवेशन होत असले तरी यावेळी त्याला वेगळे महत्त्व आहे. गेले दीड दशक विरोधी पक्षाचे आमदार म्हणून अधिवेशनात हजर राहणारे नागपूरकर देवेंद्र फडणवीस या अधिवेशनात मुख्यमंत्री म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या अधिवेशनाची तयारीही जय्यत सुरू आहे. नागपूरमधील विधानभवनाच्या जुन्या आणि नवीन इमारतींच्या रंगरंगोटीसह इतर डागडुजीची कामे जवळपास पूर्ण होत आली आहेत. रविभवनातील मंत्री आणि सचिवपातळीवरील अधिकाऱ्यांचे बंगले, इतर खोल्यांची डागडुजीही पूर्णत्वाकडे आहे. शिवाय बंगल्यांच्या सजावटीवर व परिसराच्या सौंदर्यीकरणावरही लक्ष दिले जात आहे. या तयारीची काही बोलकी छायाचित्रे.