शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

१ एप्रिलपासून विजेचे नवे दर ! स्मार्ट मीटर बसवल्यास 'कॅशबॅक' मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 11:58 IST

Nagpur : महावितरणच्या दरवाढ याचिकेत 'टीओडी'चा प्रस्ताव; कमी वापर करणाऱ्या वीजग्राहकांना थोडा दिलासा तर जास्त वीज वापरणाऱ्यांना दरवाढीचा शॉक

कमल शर्मा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महावितरणने राज्य वीज नियामक आयोगासमोर २०२५ ते २०३० या वर्षासाठी दाखल केलेली दरवाढ याचिका आता सार्वजनिक झाली आहे. १ एप्रिलपासून विजेचे नवे दर लागू करण्यात येणार आहे. यामध्ये कमी वापर करणाऱ्या वीजग्राहकांना थोडा दिलासा तर जास्त वीज वापरणाऱ्यांना दरवाढीचा शॉक बसणार आहे.

याचिकेत घरगुती ग्राहकांनाही टीओडी (टॅरिफ ऑफ द डे) दराचा लाभ देण्याची परवानगी मागितली आहे. या अंतर्गत सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत प्रतियुनिट ८० पैसे इतकी मोठी सूट दिली जाणार आहे. म्हणजे एक प्रकारे त्यांना या काळात 'कॅशबॅक' मिळणार आहे. एकंदरीत महावितरणने यावेळी ग्राहकांना जबर धक्का दिलेला नाही.

महावितरणच्या स्मार्ट मीटरला होत असलेला विरोध विचारात घेता घरगुती ग्राहकांसाठी टीओडी दर लागू करेल. अशा आशयाची बातमी 'लोकमत'ने प्रकाशित केली होती. याचाच भाग म्हणजे कंपनीने स्मार्ट प्रीपेड मीटरचे नाव टीओडी मीटरमध्ये बदलण्याचा निर्णय घेतला आहे. महावितरणने आपल्या याचिकेत टीओडी दर लागू करण्याची परवानगी मागितली आहे. हे टीओडी दर केवळ स्मार्ट प्रीपेड मीटरपासून शक्य आहे. म्हणूनच, हा निर्णय स्मार्ट मीटरसाठी घेतल्याचे दिसते. 

विजेच्या दराचा विचार करता प्रतियुनिट दर शून्य ते १०० युनिट्साठी आता ४.७१ रुपये असून तो ४.३७ रुपये करण्यात आला आहे. याहून अधिक युनिटचा वापर असल्यास वीजदर वाढीला सामोरे जावे लागणार आहे. 

निश्चित शुल्कात वाढ महावितरणने पुन्हा एकदा निश्चित शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. घरगुती ग्राहकांना आता १२८ रुपये ऐवजी १३० रुपये द्यावे लागेल. व्यावसायिक ग्राहकांनाही आता ५१७ रुपयांऐवजी ५५० रुपये मोजावे लागणार आहेत.

जनसुनावणीनंतर निर्णय नियामक आयोग आता महावितरणच्या याचिकेवर विविध शहरांमध्ये जनसुनावणी घेऊन निर्णय देणार आहे. २५ फेब्रुवारीला नवी मुंबई, २७ फेब्रुवारीला पुणे, २८ फेब्रुवारीला नाशिक, १ मार्चला छत्रपती संभाजीनगर, ३ मार्चला अमरावती आणि ४ मार्चला नागपूर येथे जनसुनावणी होणार आहे. १ एप्रिलपासून नवे दर लागू होतील.

वापरावर किती बिल (स्मार्ट मीटरशिवाय)युनिट           आधीचे             १ एप्रिलनंतर ०                   १२८                     १३० रु. १००               ७१६ रु.                 ७१३ रु. २००               १८६२ रु.               १९७८ रु. ३००               ३००८ रु.                ३२३८ रु. ५००               ६१५२ रु.                ६६३३ रु. 

टॅग्स :electricityवीजnagpurनागपूर