ऑक्सिजन सप्लायचे नवे कनेक्शन लावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:09 IST2021-03-26T04:09:20+5:302021-03-26T04:09:20+5:30
लाेकमत इम्पॅक्ट नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयाे) रुग्णालयातील नवजात बालकांच्या वाॅर्ड क्रमांक १ मध्ये सेंट्रलाईज ऑक्सिजन ...

ऑक्सिजन सप्लायचे नवे कनेक्शन लावले
लाेकमत इम्पॅक्ट
नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयाे) रुग्णालयातील नवजात बालकांच्या वाॅर्ड क्रमांक १ मध्ये सेंट्रलाईज ऑक्सिजन सप्लाय सिस्टीम ऑपरेट करण्यात अडचणी येत हाेत्या. रुग्णालय प्रशासनाने ही बाब गंभीरतेने घेत आवश्यक व्यवस्था केली. वाॅर्डच्या सेंट्रलाईज ऑक्सिजन सिस्टीमचे सर्व कनेक्शन नवीन लावण्यात आले. उल्लेखनीय म्हणजे लाेकमतने गुरुवारी मेयाेच्या नवजात बाल वाॅर्डात वेळेवर ऑक्सिजन सप्लाय बदलणे कठीण जात असल्याची बाब प्रकाशात आणली हाेती. बातमी प्रकाशित हाेताच रुग्णालयाने तत्परता दाखवीत सुधार करण्यात आला.
वाॅर्डच्या सूत्रानुसार, रुग्णालय प्रशासनाने ऑक्सिजन कनेक्शन बदलण्याच्या कामासाठी तीन शिफ्टमध्ये पुरुष कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. दुसऱ्या संबंधित विभागात संपर्क केल्यानंतर ऑक्सिजन सप्लाय बदलणारा कर्मचारी त्वरित वाॅर्डात उपस्थित हाेईल. विशेष म्हणजे वाॅर्डात कनेक्शन खराब असल्याची बाब समाेर आली हाेती, ज्यामुळे धाेका हाेण्याची शक्यता निर्माण झाली हाेती. वाॅर्डाच्या कर्मचाऱ्यांनीही याबाबत तक्रार केली हाेती. वाॅर्ड क्रमांक १ मध्ये ऑक्सिजन कनेक्शन बदलण्यासाठी महिला अटेंडन्स कर्मचारीला सूचना देण्यात आली हाेती. मात्र ऑक्सिजन सप्लाय कनेक्शन सुरू करणे व ऑक्सिजन संपल्यानंतर बदलण्यासाठी प्रशिक्षित पुरुष कर्मचाऱ्याची आवश्यकता असते, कारण हे जम्बाे सिलेंडर खूप वजनदार असतात. ऑक्सिजन संपण्याच्या १० मिनिटापूर्वी अलार्म वाजताे. या काळात सिलेंडर बदलणे आवश्यक असते. मात्र आवश्यक कर्मचारी नसल्याने वाॅर्डात अनेक अडचणी येत हाेत्या. अशाप्रकारची उदासीनता बाल वाॅर्डात धाेकादायक ठरणारी आहे. ही अव्यवस्था आणि बेजबाबदारपणा दर्शविणारी बातमी प्रकाशित केल्यानंतर प्रशासनाने आवश्यक सुधारणा केली आहे.