नवीन विमानात जुन्या बी-७७७ चे पार्ट लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:12 IST2021-08-22T04:12:04+5:302021-08-22T04:12:04+5:30
वसीम कुरैशी नागपूर : मिहान येथील एआयईएसएलच्या एमआरओमध्ये एक वर्षापेक्षा जास्त वेळेपासून दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या विमानाला आता नवीन लूक ...

नवीन विमानात जुन्या बी-७७७ चे पार्ट लागणार
वसीम कुरैशी
नागपूर : मिहान येथील एआयईएसएलच्या एमआरओमध्ये एक वर्षापेक्षा जास्त वेळेपासून दुरुस्तीसाठी उभ्या असलेल्या विमानाला आता नवीन लूक येणार आहे. विमानाच्या कॅबिनचे नवीनीकरण करण्यात येत आहे. देशात व्हीव्हीआयपीकरिता खरेदी करण्यात आलेल्या दोन नवीन बोईंग-७७७ ला नवीनीकरणासाठी अमेरिकेत पाठविण्यात आले आहे. यातील सीटांसह काही सुटे भाग काढून नागपूर एमआरओमध्ये पाठविण्यात आले आहेत.
नवीन विमानांमधून काढण्यात येणारे सामान व सुट्या भागांनी दोन जुन्या विमानांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. एअर इंडिया इंजिनीअरिंग सर्व्हिसेस लिमिटेडच्या हँगरच्या बाहेर उभ्या असलेल्या बी-७७७ ईआर विमानाचे सुटे भाग काढून दुसऱ्या विमानाची दुरुस्ती करण्यात आली आहे. लॉकडाऊन दरम्यान हे विमान एअर इंडियाच्या अन्य दुरुस्तीच्या विमानासाठी वरदान ठरले आहे.
पहिल्यांदा होत आहे कॅबिनचे नवीनीकरण
एमआरओमध्ये पहिल्यांदा अन्य जम्बो जेटच्या कॅबिनचे नवीनीकरण करण्यात येत आहे. एक वर्षापासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेले विमान सॅन फ्रॅन्सिस्को आणि कॅनडाकरिता चालविण्यात येत होते. आता नवीन सीट, इंटेरिअर आणि अन्य नवीन सुट्या भागांसह पुन्हा तयार होणार आहे. नवीनीकरणानंतर या विमानामध्ये ३५० प्रवासी क्षमता होईल.